scorecardresearch

Video: “१० रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर…” चाहत्यांच्या घोषणेनंतर अभिनेत्रीला हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूरचा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

shraddha kapoor video viral
श्रद्धा कपूरचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात श्रद्धासह अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटातून श्रद्धा व रणबीर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. श्रद्धा व रणबीरला ऑन स्क्रीन एकत्र पाहण्यासाठी चाहतेही आतूर आहेत.

‘तू झुठी मैं मक्कार’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूरने अहमदाबादमधील एका मॉलमध्ये हजेरी लावली होती. या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन श्रद्धाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये चाहते श्रद्धाबद्दल घोषणा करताना दिसत आहेत.”१० रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर सेक्सी” असं चाहते म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा>> पोटनिवडणुकीचा एमसी स्टॅनला फटका! रॅपरच्या पुण्यातील कॉन्सर्टची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार इव्हेंट

चाहत्यांनी घोषणा देताच श्रद्धा त्यांच्याकडे माईक देण्याची विनंती करताना दिसत आहे. “१० रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर सेक्सी” या चाहत्यांनी श्रद्धासाठी दिलेल्या घोषणा अभिनेत्रीच्या पसंतीस उतरल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडे माईक दिल्यानंतर त्यांनी श्रद्धासाठी मोठ्या आवाजात दिलेल्या घोषणेने अभिनेत्री लाजल्याचं दिसत आहे. याबरोबरच श्रद्धाला हसूही अनावर झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> “इंडस्ट्रीची गोल्ड डिगर” जॅकलिन फर्नांडिसला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “सुकेश भाई…”

‘तू झुठी मैं मक्कार’चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर व श्रद्धा कपूरसह डिंपल कपाडिया व बोनी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:07 IST