actress sonam kapoor sent beautiful gifts and cards for bipasha basu daughter devi spg 93 | खेळणी, शुभेच्छांचे कार्ड्स; सोनम कपूरने बिपाशाच्या लेकीसाठी पाठवल्या भेटवस्तू | Loksatta

खेळणी, शुभेच्छांचे कार्ड्स; सोनम कपूरने बिपाशाच्या लेकीसाठी पाठवल्या भेटवस्तू

अनेकांनी बिपाशाकडे लेकीचा चेहरा दाखवण्याची मागणी केली होती.

bipasah sonam
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांच्यासाठी खास ठरलं. १२ नोव्हेंबर करण आणि बिपाशाच्या घरी लग्नाच्या जवळपास ६ वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला. लेकीच्या जन्मानंतर बिपाशाने चाहत्यांना तिच्या नावाची माहिती दिली होती. बिपाशाने लेकीचं नाव ‘देवी’ असं ठेवलं. तर दुसरीकडे सोनम कपूरने मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव वायू असे ठेवले आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री जरी एकमेकींच्या स्पर्धक असल्या तर खासगी आयुष्यात चांगल्या मैत्रिणी असतात. सोनमने बिपाशाच्या मुलीसाठीएक भेटवस्तू पाठवली आहे. ज्याचा व्हिडीओ बिपाशाने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका सुंदर गिफ्ट बॉक्सची झलक दिसत आहे. सोनमकडून देवीसाठी खेळण्यांनी भरलेली टोपली मिळाली आहे. ज्यात काही हाताने लिहलेली शुभेच्छा देणारी कार्ड्सदेखील आहेत.

“माझ्यासाठी ते…” एमी जॅक्सनबरोबर झालेल्या ब्रेकअपवर प्रतीक बब्बरचा खुलासा

कार्डमध्ये लिहिले आहे, ‘प्रिय बिप्स आणि करण.. तुमच्या बाळाचे अभिनंदन. बाळ एक वरदान आहे आणि मला खात्री आहे की ‘देवी’ तुम्हाला खूप प्रेम देईल.’ यावर बिपाशाने आपली प्रतिक्रिया दिली आहे ‘धन्यवाद सोनम कपूर, आनंद आहुजा आणि वायु…’ देवीला तुमच्या भेटवस्तू आवडल्या. अभिनेत्रीने ठेवलेल्या मुलीच्या नावावर चाहते खूप खूश आहेत. त्यावेळी अनेकांनी बिपाशाकडे लेकीचा चेहरा दाखवण्याची मागणी केली होती. आता चाहत्यांची इच्छा पूर्ण करत बिपाशाने लेक देवीची पहिली झलक दाखवली आहे.

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा आई झाली आहे. ज्यामुळे दोघंही खूप खूश आहेत. त्यांचे चाहतेदेखील त्यांचे अभिनंदन करत आहेत. चाहते छोट्या देवीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:05 IST
Next Story
विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली, “तो मला…”