scorecardresearch

Premium

“नवरा कमी आणि वडीलच जास्त वाटतोय…,” सोनाली सेहगलच्या लग्नाचे फोटो व्हायरल, अभिनेत्री ट्रोल

आज अभिनेत्री सोनाली सेहगलने तिचा बॉयफ्रेण्ड आशीष सजनानीशी लग्न केलं.

sonali sehgal

सेलिब्रिटी आणि त्यांची लग्नं ही नेहमीच चर्चेचा विषय असतात. जवळपास सगळेच बॉलीवूड स्टार्स राजेशाही थाटात विवाहबंधनात अडकतात. आज अभिनेत्री सोनाली सेहगल बोहल्यावर चढली आहे. तिने तिचा बॉयफ्रेण्ड व्यावसायिक आशीष सजनानीशी लग्न केलं. पण आता त्यावरून तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

आशीष सजनानीशी लग्न करताच त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या फोटोंमध्ये सोनालीच्या नवऱ्याला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तो तिच्यापुढे खूप वयस्कर वाटतो, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

आणखी वाचा : Video: “मी दिया मिर्झा शपथ घेते की…” अभिनेत्रीने मराठी बोलत केला पतीचा स्वीकार, व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

सोनालीने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या लग्नसोहळ्यात सोनालीने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता, तर आशीषने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. हे फोटो बघताच तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या, पण अनेकांनी कमेंट्स करूत तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

हेही वाचा : ‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने फक्त १.५ लाखांत केलेलं स्वतःचं लग्न, लेहेंग्याची किंमत होती फक्त…

का नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ही सगळी त्याच्याकडे असणाऱ्या पैशांची कमाल आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हे कोण काका बसलेत तिच्या बाजूला?” तर तिसरा म्हणाला, “हा तिचा नवरा कमी आणि वडीलच जास्त वाटतोय.” तर आणखी एकाने लिहिलं, “याला पाहून मला वाटलं की हिचे वडील कन्यादान करायला आले होते.” तर आणखी एक जण म्हणाला, “हे चांगलं आहे.. आधी तरुण मुलांना डेट करायचं आणि मग वयस्कर व्यक्तीशी लग्न करून भविष्य सुरक्षित करायचं.” आता या फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sonnalli seygall gets troll for her wedding pic netizens said her husband looks like her father rnv

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×