scorecardresearch

Premium

“तू माझा जीव वाचवलास…,” सनी लिओनीने मानले पती डॅनियलचे आभार, जाणून घ्या नेमकं काय घडलं

डॅनियल आणि सनी यांच्यात असलेलं हे घट्ट बॉण्डिंग नेटकऱ्यांना चांगलंच भावलं.

sunny deniel

अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काय दिवसांपूर्वीच ती पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकली. तिची प्रमुख भूमिका असलेला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘कॅनेडी’ चित्रपटाचं या फिल्म फेस्टिवलमध्ये भरपूर कौतुक झालं. तर आता संपूर्ण काळात तिच्याबरोबर राहिलेल्या तिचा पती डॅनियलसाठी तिने खास पोस्ट लिहिली आहे.

डॅनियलसाठी खास पोस्ट लिहित सनीने त्याचे आभार मानले. तिने लिहिलं, “देवाने तुला माझ्या कठीण काळात माझ्याकडे पाठवलं. त्यावेळी खरोखर तू माझा जीव वाचवलास आणि आजपर्यंत मला साथ करत आला आहेस. गेली पंधरा वर्षं आपण एकत्र आहोत. कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा क्षण तुझ्या पाठिंब्याशिवाय अनुभवणं शक्य नसतं झालं.”

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
tanushree dutta on nana patekar
“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

आणखी वाचा : लिंक्डइनने ब्लॉक केलं सनी लिओनीचं अकाउंट, कारण ऐकून नेटकरी हैराण

पुढे तिने लिहिलं, “मला पुढे जाण्यासाठी आणि माझी स्वप्न साकार करण्यासाठी तू केलेली लढाई ही खरोखर निस्वार्थतेची उच्च पातळी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद!” तर यावर तिचा पती डॅनियलने कमेंट करत सनीचं कौतुक केलं. त्याने लिहिलं, “आज तुझ्याकडे जे आहे ते तू स्वतः कमवलं आहेस…. माझ्याबरोबर किंवा माझ्याशिवाय… माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही फक्त सुरुवात आहे.”

हेही वाचा : पत्रकाराच्या ‘त्या’ मागणीवर सनी लिओनीच्या उत्तराने वेधलं लक्ष म्हणाली, “आता मी तुमच्याकडे…”

सनीची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते तिच्या कामाचा कौतुक करत आहे तर पण त्याचबरोबर डॅनियल आणि सनीमध्ये असलेला हे घट्ट बॉण्डिंग पाहून नेटकरी भारावले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 10:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×