ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वी तबस्सुम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी पुन्हा प्रकृती बिघडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

तबस्सूम यांचं पूर्ण नाव तबस्सूम गोविल होतं. ७८ वर्षांच्या तबस्सुम या तब्बल ७५ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी १९४७ मध्ये बेबी तबस्सूम म्हणून चित्रपटसृष्टीत करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी आयुष्यभरात एकूण सहा माध्यमांमधून काम केलं.तबस्सूम यांचा जन्म १९४४ साली मुंबईत झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव अयोध्यानाथ सचदेव होतं, तर आईचं नाव असगरी बेगम होतं. तर तबस्सूम यांचं मूळ नाव किरण बाला सचदेव होतं. तबस्सूम यांनी २०१९ मध्ये लोकप्रभा दिवाळी अंकासाठी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली होती.

हेही वाचा – व्हीलचेअरवर बसून तबस्सूम शो होस्ट करत असतानाच आग लागली अन्…; अमिताभ बच्चन यांनी वाचवलेला जीव

“माझे आईवडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते, पत्रकार होते. ते स्वत:चं मासिक काढत. अली सरदार जाफरी, कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी हे तेव्हा आमच्या मासिकात लिहीत. माझं लहानपण या लोकांच्या अंगाखांद्यावर गेलं आहे. माझं व्यक्तिमत्त्व घडलं ते माझ्या आईवडिलांमुळे. माझे वडील पंजाबी हिंदू होते. ते भगतसिंग यांच्या सहकाऱ्यांपैकी होते, स्वातंत्र्यसैनिक होते. माझी आई मुस्लीम, पठाण होती. तिच्या कुटुंबातले सगळे लोक खूप शिकलेले होते. माझ्या आईवडिलांचं, दोघांचंही असं म्हणणं होतं की, कुणालाही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्याने नीट शिक्षण घेतलं पाहिजे. मी इतक्या वर्षांचं करिअर केलं, त्यामागे माझी शिक्षणाने तल्लख झालेली बुद्धी आहे. त्यात अंध:कार नाही. मी प्रत्येक गोष्ट नीट विचार करून बोलते, करते,”  असं तबस्सूम यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा – “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

यावेळी त्यांनी त्यांच्या घरातील विविधतेवर भाष्य केलं होतं. तबस्सूम यांचे वडील पंजाबी हिंदू तर आई मुस्लीम पठाण होत्या. तबस्सूम यांनी विजय गोविल यांच्याशी लग्न केलं. त्यांना होशिंग गोविल नावाचा एकच मुलगा आहे. तर त्यांची सून हेमाली गुजराती ब्राह्मण आहे. “माझ्या घरात सगळा भारत एकवटला आहे. राष्ट्रीय एकात्मता माझ्या घरातच आहे. आमच्याकडे खाणंपिणं, धर्म कशावरही सासू-सून- नवरा-बायको यांच्यामध्ये कधीही भांडणं झालेली नाहीत. म्हणूच कदाचित माझं इतकं वय झालं असलं तरी लोकांना मी आवडते,” असं तबस्सूम यांनी सांगितलं होतं.