Tamannaah Bhatia : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने तमन्ना भाटियाने साऱ्यांनाच भुरळ पाडली आहे. तमन्ना कायम तिच्या कामामुळे चर्चेचा विषय ठरते. तसेच ती महिला सशक्तीकरणावरही परखडतेने स्वत:चे मत मांडते. नुकतेच तमन्नाने सिनेविश्वात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यावरही भाष्य केले आहे. तमन्नाने यासाठी महिलांनी आधी स्वत:चा दृष्टिकोन बदलणे किती गरजेचे आहे, हे सांगितले आहे.

सध्या तमन्ना भाटिया ‘सिकंदर का मुकद्दर’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. अशात नुकतीच तिने यानिमित्त स्क्रीन लाइव्हला मुलाखत दिली. त्यावेळी सिनेविश्वात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी तिने तिचे मत व्यक्त केले. तमन्ना म्हणाली की, “महिलांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्या स्वत:ला एक महिला म्हणून संबोधित करतात. मात्र, त्यांनी स्वत:ची ओळख एक महिला म्हणून सांगण्याऐवजी एक व्यक्ती आणि मानव असल्याची सांगितली पाहिजे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : Video : कोकणात पार पडला मराठी अभिनेत्याचा विवाहसोहळा! लग्नानंतर पत्नीचं बदललं नाव…; उखाणा घेत म्हणाला…

“स्त्री-पुरुष हा भेदभाव आपल्यापासूनच सुरू झाला आहे. महिलांनी त्यांची मानसिकता तशी करून घेतली आहे. महिलांनी ही मानसिकता बदलली पाहिजे. त्यांनी स्वत:ला पुरुषांच्या बरोबरीचे समजले पाहिजे. आपणच हा बदल स्वीकारला नाही तर अन्य व्यक्ती हा बदल कसे स्वीकारतील?”, असे तमन्नाने यावेळी सांगितले आहे.

“सिनेविश्वात महिलांना समान वागणूक मिळावी यावर बोलताना तमन्ना म्हणाली, “मी निश्चितपणे स्वत:ला एक अशी व्यक्ती समजते, जी विविध गोष्टी करू शकते. मला खरंच असे वाटते की, तुम्हाला जर सिनेविश्वात मोठे नाव कमवायचे असेल तर आधी तुम्ही यात सहभागी झाले पाहिजे. तुम्हाला या खेळात स्वत:ला उतरावे लागेल”, असेही तमन्नाने पुढे सांगितले.

पुढे तमन्नाने महिलांनी ही मानसिकता बदलावी यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. ती म्हणाली, “काही व्यक्ती असे म्हणतात की, एका रात्रीत सारे काही बदलले जाऊ शकते. मात्र, फक्त असे बोलणे आणि प्रत्यक्षात असे करणे यात फार फरक आहे. सिनेविश्वातील महिलांसाठी असलेली मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला स्वत:ला आधी यात सहभागी व्हावे लागेल.”

हेही वाचा : कंगना रणौतने एक्स बॉयफ्रेंडच्या मुलीला पहिल्याच चित्रपटात केलेलं रिप्लेस; झरीना वहाबचा मोठा खुलासा, म्हणाली…

“अनेक महिला असा विचार करतात की, त्या काही ठराविक गोष्टींची मागणी करू शकत नाहीत. तसे केल्यास त्यांना येथून काढून टाकले जाईल, त्यामुळे आधी असे विचार आपण आपल्या डोक्यातून दूर केले पाहिजेत. जर तुम्हाला तुमचे काम व्यवस्थित येत आहे, तर तुम्ही मागे हटू नका; माझी मानसिकता कायम सकारात्मक असते, मी कधीच असा विचार केला नाही की मी हे करू शकणार नाही. मी नेहमी स्वत:बद्दल सकारात्मक विचार केला आहे. जर तुम्हीही असा विचार केला, तरच काहीतरी बदल घडू शकतो”, असे तमन्ना म्हणाली.

Story img Loader