Premium

उर्वशी रौतेलाने मुंबईत खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत तब्बल १९० कोटी? अभिनेत्रीच्या आईनेच सांगितलं सत्य, म्हणाली…

अलीकडेच तिने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं. हे नवीन घर खरेदी करत ती यश चोप्रा यांची शेजारीण झाली.

urvashii

मॉडेल-अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं. हे नवीन घर खरेदी करत ती यश चोप्रा यांची शेजारीण झाली. या तिच्या नवीन घराबद्दल सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्ये या तिच्या नवीन घराची किंमत १९० कोटी आहे, असंही बोललं जात आहे. मात्र आता तिच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक महिन्यांपासून उर्वशी नवीन घराच्या शोधात होती. ती लोखंडवाला परिसरातील एका नवीन घरात राहायलाही जाणार होती. पण काही कारणास्तव ती तिथे गेली नाही आणि आता या तिने घेतलेल्या जुहूच्या नवीन बंगल्यात शिफ्ट झाली आहे. यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा त्यांच्या निधनापूर्वी या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यात राहत होत्या.

आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या ६० लाखाच्या ड्रेसची सर्वत्र रंगली चर्चा, ‘असा’ होता तिचा आकर्षक लूक

या तिच्या नवीन बंगल्यात खासगी जिम, स्विमिंग पूल, सुंदर गार्डनही आहे, या बंगल्यातील खोल्याही आलिशान आहेत. या बंगल्याची एकूण किंमत १९० कोटी आहे, अशा बातम्या पसरल्या होत्या. परंतु उर्वशीच्या आईने यावर मौन सोडलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यावर “फेक” असं लिहीत या घराची किंमत १९० कोटी असल्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “लवकरच असा दिवस येवो की सगळ्या न्यूज चॅनेलची ही इच्छा पूर्ण होवो.”

हेही वाचा : आयफेल टॉवरवर सेलिब्रेशन, सोन्याचे कपकेक…; वाढदिवसासाठी उर्वशी रौतेलाने केला ‘इतका’ खर्च, रक्कम वाचून व्हाल थक्क

तर या अफवा निर्माण होण्याचं कारण हे उर्वशीची लाइफस्टाइल असल्याचं तिचे चाहते म्हणत आहेत. उर्वशी अनेकदा महागडे कपडे, ज्वेलरी परिधान केलेली दिसते, दर वेळी ती आलिशान गाड्यांमधून फिरताना दिसते. इतकंच नाही तर तिने तिचा गेला वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने ९० लाख खर्च केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 16:41 IST
Next Story
गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर इलियाना डिक्रूजने पहिल्यांदाच शेअर केला बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो, म्हणाली…