दिग्दर्शक ओम राऊत हा सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या बहुचर्चित चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास प्रभू श्रीरामांची, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या अंतिम ट्रेलरसाठी तिरुपतीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती, परंतु या दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमुळे सध्या नवा वाद सुरु झाला आहे.

हेही वाचा : “आयुष्यातील सर्वात वाईट दिवस…” शाहिद कपूर म्हणाला, ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ चित्रपटाचे शूट करताना…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

तिरुपती बालाजी मंदिर परिसरात देवदर्शन झाल्यावर एकमेकांचा निरोप घेतल्यावर दिग्दर्शक ओम राऊतने क्रिती सेनॉन किस केले. मंदिराच्या परिसरात असे वर्तन केल्याने सध्या दोघेही प्रचंड ट्रोल होत आहे. आंध्रप्रदेशमधील भाजपा नेते रमेश नायडू नागोथू यांनी याबद्दल ट्वीट करत आक्षेप नोंदवला आहे. यानंतर आता तेलंगणातील चिलकुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनीही या घटनेला निंदनीय म्हटले आहे. चिलकुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी म्हणाले, “हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. पती-पत्नीसुद्धा तिथे (मंदिरात) एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाऊन हवं ते करू शकता. मंदिराच्या परिसरात असे वर्तन करणे म्हणजे रामायण आणि देवी सीतेचा अपमान करण्यासारखे आहे.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ फेम ओम राऊतने मंदिराच्या आवारात केलं क्रीती सेनॉनला किस; भाजपा नेत्याने ट्वीट करत दिली माहिती

ओम राऊत आणि क्रितीच्या व्हायरल व्हिडीओवर भाजपा नेते रमेश नायडू नागोथू यांनी आक्षेप नोंदवत “इतक्या पवित्र ठिकाणी असे वर्तन कितपत योग्य आहे? वेंकटेश्वर स्वामी मंदिरात अशाप्रकारे मिठी मारणे आणि किस करणे हे अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे.” असे ट्विट केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलिट केल्याचेही समोर आले, परंतु तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

फोटो : सोशल मीडिया

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत; जाणून घ्या कधी आणि कुठे?

दरम्यान, या संपूर्ण वादावर अद्याप दिग्दर्शक ओम राऊत आणि क्रिती सेनॉन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.