scorecardresearch

Premium

बजरंग बलीपुढे ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत नतमस्तक; या मंदिरात जाऊन घेतलं दर्शन

ओम राऊत यांचे हे फोटो ‘टी सीरिज’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

om raut seeks blessing of hanuman
ओम राऊत हनुमंताचरणी नतमस्तक (फोटो : ट्विटर / टी सीरिज)

राम नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण त्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला. बऱ्याच लोकांनी पोस्टरमधील चुका निदर्शनास आणून दिल्या. टीझरमुळे वादात अडकलेला चित्रपट ‘आदिपुरुष’ पोस्टरनंतरही चांगलाच वादात अडकला. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.

आता नुकतंच हनुमान जयंतीनिमित्त या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. देवदत्त नागेचा हा लूक पाहून बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या तर काही लोकांनी देवदत्त नागेच्या मेहनतीची दखल घेत त्याची प्रशंसा केली. हनुमान जयंतीचं निमित्त साधून याच चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनीही हैद्राबादच्या करमन घाट येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताचे दर्शन घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

vinod-khanna
“चित्रपटात काम केलं तर गोळी मारेन”; दिवगंत अभिनेते विनोद खन्ना यांना वडिलांनी दिलेली धमकी, काय आहे ‘तो’ किस्सा? घ्या जाणून
aishwarya and avinash narkar
Video : “रब ने बना दी जोडी”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचे जुने फोटो पाहिलेत का?, नेटकरी म्हणाले…
sindhudurg kokan tour aditya thackeray in kokan for ganpati darshan vinayak raut home bhajan video viral
VIDEO: हाती टाळ घेऊन आदित्य ठाकरे भजनात दंग! विनायक राऊतांच्या घरी ठाकरे भजनात रमले
ajinkya deo
Video: “माय आता भेटत नाही…”; आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक

आणखी वाचा : केवळ अभिनेतेच नव्हे तर ‘या’ गायकांनीही लपवलं त्यांचं खरं नाव; आजही करतात करोडो रसिकांच्या मनावर राज्य

ओम राऊत यांचे हे फोटो या चित्रपटाची निर्मिती कंपनी ‘टी सीरिज’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये ओम राऊत हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या यशासाठी ओम राऊत यांनी बजरंग बलीचे आशीर्वाद घेतले आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉयकॉट आदिपुरुष’ या ट्रेंडचा त्याला सामना करावा लागला. तसेच सैफ, प्रभासची या चित्रपटामधील भूमिका प्रेक्षकांना फारशी पटलेली नाही. रावणाच्या भूमिकेमधील सैफला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. आता नव्या पोस्टर्समधून या चित्रपटात काही बदल करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. हा चित्रपट १६ जून २०२३ ला संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adipurush director om raut visits karnaghat hanuman temple occasion hanuman jayanti avn

First published on: 06-04-2023 at 18:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×