मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि पहिले गाणे ‘जय श्री राम’ यास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यावर आता निर्मात्यांनी चित्रपटातील ‘राम सिया राम…’ हे दुसरे गाणे प्रदर्शित केले आहे.

हेही वाचा : ‘शार्क टॅंक’फेम अशनीर ग्रोव्हरला Rodies मध्ये पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले “ये किस लाइन में आ गए आप…”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

‘राम सिया राम…’ या गाण्याची सुरुवात प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्यामधील संवादाने होते. “तुम राजकुमारी हो जानकी, तुम्हारी जगह मेहलो मैं है” असे राघव आपली पत्नी जानकीला उद्देशून बोलत असतात, यानंतर गाणे सुरु होते. २ मिनिटे ५० सेकंदाच्या या गाण्यात प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांच्यामधील संवाद, १४ वर्षांचा वनवासादरम्यानचे त्यांचे जीवन दाखवण्यात आले आहे. हे गाणे संगीत क्षेत्रातील लोकप्रिय आणि सध्याची आघाडीची जोडी सचेत-परंपरा यांनी संगीतबद्ध केले असून त्यांनीच गायले आहे नेटकरी सध्या या जोडीचे विशेष कौतुक करीत आहेत. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला या गाण्याचे गीतकार आहेत.

हेही वाचा : “वडील हे माझे एकमेव मित्र…” पहिला IIFA पुरस्कार जिंकल्यावर बाबिल खानला आली इरफान खान यांची आठवण, म्हणाला…

सोमवारी (२९ मे) दुपारी बारा वाजता सर्व म्युझिक चॅनल, फिल्म चॅनल, रेडिओ स्टेशन आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात या गाण्याला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. चाहत्यांनी कमेंट करीत आमच्या कडे शब्द नाहीत, “प्रभू श्रीरामाचे भजन ऐकून आम्ही धन्य झालो…”, जय श्री राम अशा प्रतिक्रिया देत आदिपुरुषच्या टीमचे कौतुक केले आहे.

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.