मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या गाण्यातून श्रीरामाच्या भक्तीचा जागर करण्यात येत आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या ‘जय श्री राम’ गाण्याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘जय श्री राम’ हे ‘आदिपुरुष’मधील पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून अजय-अतुलच्या संगीताने पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकले आहे. जवळपास २ मिनिटे ३९ सेकंदांचे हे पूर्ण गाणे ऐकल्यावर अंगावर शहारे येतात, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची वाटचाल २०० कोटींच्या दिशेने, १५ दिवसात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘आदिपुरुष’मधील ‘जय श्री राम’ हे गाणे मनोज शुक्ला यांनी लिहिले असून अजय-अतुलने संगीतबद्ध केले आहे. मुंबईमध्ये अनोख्या पद्धतीने पहिले गाणे रिलीज करता यावे यासाठी ‘आदिपुरुष’च्या टीमने विशेष तयारी केली होती. अजय-अतुल यांच्यासह ३० जणांच्या कोरस टीमने लाइव्ह परफॉर्म केल्यावर हे गाणे लॉंच करण्यात आले. दिग्दर्शक ओम राऊत, भूषण कुमार यांच्याबरोबर अजय-अतुल यांनी मोठ्या भक्तिभावाने ‘जय श्री राम’ गाणे बनवले आहे, असे या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले.

हेही वाचा : “तुझ्या आयुष्यात महत्त्वाचे कोण?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत विकी कौशलने शेअर केला ‘तो’ फोटो

‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.