Aditi Rao Hydari and Siddharth Wedding News : ‘हीरामंडी’ फेम बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि ‘रंग दे बसंती’ फेम लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ हे दोघं नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अदितीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद दिला आहे. या दोघांच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. अदिती-सिद्धार्थचे निवडक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे.

अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडला. अभिनेत्रीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य परंपरेनुसार पांढरा कुर्ता घालून लुंगी नेसली होती. अदितीने शेअर केलेल्या फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात त्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.

Raha Kapoor talking to dadi Neetu Kapoor video viral
Video: राहा कपूरचा आवाज ऐकलात का? आजीला पाहून खूश झाली आलिया-रणबीरची लेक, म्हणाली…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Vivek Oberoi on akshay kumar fitness routine
“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Vivek Oberoi shifted to Dubai
तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?

हेही वाचा : अदिती राव हैदरीशी सिद्धार्थ कधी करणार लग्न? गुपचूप साखरपुडा उरकल्यावर अभिनेत्याने केला होत खुलासा; म्हणाला, “याचा निर्णय…”

अदितीने शेअर केले सुंदर फोटो

Aditi Rao Hydari and Siddharth Wedding
अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांचा लग्नसोहळा ( Aditi Rao Hydari and Siddharth Wedding Photo )

हेही वाचा : अदिती-सिद्धार्थने तेलंगणातील ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला? अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं कारण…

अभिनेत्री कॅप्शनमध्ये लिहिते, “तू माझा सूर्य आहेस, चंद्र आहेस आणि माझ्यासाठी तूच माझा तारा आहेस. लव्ह, लाइट अँड मॅजिक…मिस्टर अँड मिसेस अदु-सिद्धु” अभिनेत्रीच्या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांसह कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : प्रथमेश लघाटेने बनवले उकडीचे मोदक! नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव; सुकन्या मोने म्हणाल्या, “वाटच बघत होते…”

दरम्यान, अदिती-सिद्धार्थने ( Aditi Rao Hydari and Siddharth ) २७ मार्च रोजी साखरपुडा केला होता. लग्नाप्रमाणे या दोघांनी साखरपुडा देखील गुपचूप उरकला होता. गेली अनेक वर्षे अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. ‘महासमुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये आले. २०२१ पासून त्यांनी आपल्या नात्यावर कुठेही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. परंतु, त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना अदिती-सिद्धार्थ एकत्र असल्याची कल्पना होती. आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. बॉलीवूडसह दाक्षिणात्य कलाविश्वातून सिद्धार्थ-अदितीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.