तब्बल ४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाहरुख खानने २०२३ मध्ये ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे दमदार कमबॅक केला. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आणि बऱ्याच वर्षांनी किंग खानच्या नावावर एक ब्लॉकबस्टर चित्रपट झाला. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसले होते. आता ‘पठाण’च्या सिक्वेलमध्ये शाहरुखने पुन्हा एकदा त्याच्या जबरदस्त डॅशिंग अवतारात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये एक नवा बदल करण्यात आला आहे. आदित्य चोप्रा, दीपिका पदूकोण हे पुन्हा स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. आता आदित्य चोप्रा ‘पठाण २’वर काम सुरू करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाची कथा ‘टायगर वर्सज पठाण’च्या आधीची असणार आहे.

आणखी वाचा : प्रसिद्ध पॉर्नस्टार काग्नी लिनचे ३५ व्या वर्षी निधन; जॉनी सीन्सबरोबरच्या फिल्म्समुळे मिळालेली प्रसिद्धी

‘पठाण’ हे पात्र लोकांना चांगलंच आवडलं असून या पात्राला घेऊन आणखी एक वेगळं कथानक सादर करायचा आदित्य चोप्रा यांचा विचार आहे. ‘पठाण’ सुपरहीट झाल्यावरच आदित्य चोप्राने शाहरुख खानबरोबर याच्या सीक्वलबद्दल बोलणी सुरू केली होती. ‘Tiger vs Pathaan’ या चित्रपटाच्या कथेचा पाया तयार करण्यासाठी ‘पठाण २’ काढण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

याचवर्षी डिसेंबरमध्ये ‘पठाण २’च्या चित्रीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढील वर्षी ‘पठाण २’ प्रदर्शित होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे. याबरोबरच याच स्पाय युनिव्हर्समध्ये शर्वरी वाघ आणि आलिया भट्टच्या चित्रपटाचीही भर पडली आहे. याबरोबरच ‘वॉर २’वरही काम सुरू आहे. कदाचित ‘वॉर २’ आणि ‘पठाण २’ एकाच वर्षी प्रदर्शित होऊ शकतात अन् त्यानंतर सलमान आणि शाहरुखचा ‘टायगर vs पठाण’ प्रदर्शित होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप यविषयी कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya chopra is planning to make sequel of pathaan with shahrukh and deepika avn
First published on: 20-02-2024 at 17:31 IST