Aditya Dhar Movies : आदित्य धर काही दिवसांपासून त्याच्या ‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’ या चित्रपटांमुळे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या त्याचा ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का यापूर्वीसुद्धा त्याच्या चित्रपटांनी असंच अनेकांचं लक्ष वेधलं होतं.
आदित्य धरच्या इतर चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहांत गर्दी केलेली. या चित्रपटांचं दिग्दर्शन, लेखन व निर्मिती त्यानं केलेली. हे चित्रपट कोणते आहेत, त्यांनी किती कमाई केलेली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘या’ चित्रपटांनी वेधलेलं लक्ष
आदित्य धरनं त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. आदित्यच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाबद्दल बोलायचं झालं, तर २००९ मध्ये त्याची ‘बूंद’ ही शॉर्ट फिल्म आलेली. या शॉर्ट फिल्मची कथा त्यानं लिहिलेली. महत्त्वाची बाब म्हणजे या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. त्याव्यतिरिक्त त्यानं तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, ‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’. यांचा समावेस आहे. तर ‘आर्टिकल ३७०’, ‘धूम धाम’, ‘बारामुला’ या चित्रपटांच्या लिखानाची धुरा त्यानं सांभाळलेली.
‘उरी : दर सर्जिकल स्ट्राईक’ – या चित्रपटासाठी आदित्यला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत होता; तर यामी गौतम मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती. आदित्यचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात ‘एबीपी’च्या वृत्तानुसार ३४१.७५ कोटींचा गल्ला जमवलेला आणि देशात २९३.७५ कोटींची कमाई केली.
आर्टिकल ३७० – आदित्य धरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नसलं तरी त्यानं या चित्रपटाच्या लेखनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यानं केली होती. चित्रपटात आदित्यची पत्नी यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटानं जगभरात १०५.१५ कोटी कमावले, तर भारतात ९२.६५ कोटींचं कलेक्शन केलं. चित्रपट २० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला.
धुरंधर – रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची त्यानं सहनिर्मितीही केलेली. अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी यांसारखे कलाकार यामध्ये होते. तर दुसऱ्या भागातही हे कलाकार आहेत. चित्रपटानं उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार १३०० कोटींचा गल्ला जमवलेला. हा चित्रपट फक्त हिंदीतच प्रदर्शित झाला होता.
धुरंधर २ – सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामधील रणवीर सिंहच्या कामाचं विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटानं फक्त पाच दिवसांतच उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ६१९.७६ कोटी कमावले. जगभरात आतापर्यंत या चित्रपटानं ८२९.७६ कोटींची कमाई केली आहे.
