Dhurandhar Trending In Pakistan : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला आहे. मध्य पूर्व आणि पाकिस्तानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नसतानाही, परदेशात $३३ दशलक्षपेक्षा (भारतीय रुपये २७५ ते २७७ कोटी) जास्त कमाई केली. गेल्या महिन्यात या चित्रपटाच्या एका वितरकाने सांगितले की, मध्य पूर्व आणि पाकिस्तानमध्ये न दाखवल्यामुळे चित्रपटाला $१० दशलक्ष नुकसान झाले.

आता, जगभर नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर, हा दावा काहीसा योग्य ठरत आहे. ‘धुरंधर’ नेटफ्लिक्सवर रिलीज होताच पाकिस्तानमध्ये काही दिवसांतच ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

पाकिस्तानात ‘धुरंधर’ नेटफ्लिक्सवर नंबर १ ट्रेंडिंग असल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘धुरंधर’ने ‘तेरे इश्क में’, ‘हक’ आणि ‘द बिग फेक’सारख्या बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकले. हिंदुस्थान टाइम्सने याबद्दल तपास करीत ही माहिती खरी असल्याचे सांगितलं आहे.

नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. Reddit वर एका प्रेक्षकाने लिहिले, “एक पाकिस्तानी म्हणून, हा आतापर्यंतचा सर्वोत्तम बॉलीवूड चित्रपट आहे. या चित्रपटात पाकिस्तानच्या लोकांबाबत काही नकारात्मक दाखवलं नाही. कथेतील राजकीय पक्षाचे वास्तव दाखवले आहे. दुसऱ्या भागासाठी मी खूप उत्सुक आहे. चित्रपट, कास्टिंग, शूटिंग, गोष्ट सर्व उत्कृष्ट!”

dhurandhar trending 1 on netflix in pakistan
रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ पाकिस्तानमध्ये ट्रेंडिंगमध्ये

अनेक प्रेक्षकांनी म्हटले की, हा चित्रपट पाकिस्तानला वाईट दाखवत नाही, उलट योग्यरित्या चित्रित केले आहे. पुढे आणखी एक प्रेक्षक म्हणलाय, “चित्रपटात पाकिस्तान चांगल्या प्रकारे दाखवले आहे आणि भारतावरील राजकीय दृष्टिकोनदेखील दाखवला आहे. पाकिस्तानचे लोक वाईट दाखवलेले नाहीत. हा एक उत्तम चित्रपट आहे.”

अदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून अक्षय खन्ना, सारा अर्जुन, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि इतर कलाकार आहेत. कथा एका भारतीय गुप्तहेरावर आधारित आहे.

‘धुरंधर’ने जगभर १३०० कोटी कमावले, ज्यामुळे हा दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला. चित्रपटात रणवीर सिंगबरोबर अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपालदेखील आहेत. या चित्रपटाचा सिक्वेल येत्या १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे.