Aditya Pancholi Kangana Ranaut Affair Zarina Wahab Love Story: बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत जेवढं ग्लॅमर आहे, तितक्याच वादग्रस्त प्रेमकथांमुळं अनेक कलाकार चर्चेत आले आहेत. असाच एक काळ गाजवणारा आणि आपल्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे आदित्य पंचोली. स्वतःपेक्षा ६ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम अभिनेत्री जरीना वहाब यांच्याशी लग्न केल्यानंतर दोन मुलांचा पिता असलेला हा अभिनेता पुढे तब्बल २१ वर्षांनी लहान असलेल्या कंगना रणौतच्या प्रेमात पडला.

आदित्य पंचोलीचा जन्म १२ सप्टेंबर १९६५ रोजी मुंबईत झाला. आदित्यने ४० वर्षांपूर्वी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘सस्ती दुल्हन महंगा दूल्हा’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. हुंडा प्रथेवर आधारित या चित्रपटात तिने सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती. तसेच विनोद खन्ना व माधुरी दीक्षितच्या १९८८ साली आलेल्या दयावानमध्ये त्याने काम केलं होतं.

आदित्य पंचोलीचे करिअर

आदित्य पंचोलीने इंडस्ट्रीत बरंच काम केलं, पण मुख्य अभिनेता म्हणून त्याला लोकप्रियता मिळाली नाही. १९९० सालच्या ‘जमीन’ चित्रपटातील त्याच्या कामाची खूप चर्चा झाली होती. त्याने सुरुवातीच्या काळात ‘आतिश’, ‘जादूगर’ व ‘जंग’सारखे चित्रपट केले. तसेच नंतरच्या काळात ‘बाजीराव मस्तानी’, ‘बॉडीगार्ड’, ‘जय हो’ व ‘रेस 2’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

Aditya Pancholi Zarina Wahab love story
आदित्य पंचोली व त्याची पत्नी जरीना वहाब (फोटो – जनसत्ता)

आदित्य पंचोलीने वयाने मोठ्या मुस्लीम अभिनेत्रीशी केलेलं लग्न

आदित्य पंचोलीने त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी असलेली मुस्लीम अभिनेत्री जरीना वहाबशी लग्न केलं. दोघे एका चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले होते, नंतर त्यांनी १९८६ साली लग्न केलं. या जोडप्याला सूरज पंचोली व सना पंचोली ही दोन अपत्ये आहेत. सूरज अभिनेता असून सना ज्वेलरी डिझायनर आहे.

Aditya Pancholi Zarina Wahab son sooraj pancholi
आदित्य पंचोली व जरीना वहाबचा मुलगा सूरज पंचोली (फोटो- इन्स्टाग्राम)

आदित्य पंचोली-कंगना रणौतचं अफेअर

विवाहित व दोन मुलांचा बाबा असूनही आदित्य पंचोलीने त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान कंगना रणौतला डेट केलं होतं. कंगना इंडस्ट्रीत नवखी असताना त्यांचं अफेअर होतं. दोघांचं नातं खूप वादग्रस्त ठरलं होतं. आदित्य पत्नी जरीनाकडे दुर्लक्ष करून कंगनाबरोबर राहू लागला होता. “आम्ही पत्नी-पत्नीप्रमाणे राहायचो,” असं त्याने स्वतः एका मुलाखतीत म्हटलं होतं. जवळपास ५ वर्षे ते एकत्र होते.

Aditya Pancholi Kangana Ranaut Affair
आदित्य पंचोली व कंगना रणौतचे ५ वर्षे अफेअर होते. (फोटो- सोशल मीडिया)

कंगनाने आदित्य पंचोलीवर केले होते मारहाणीचे आरोप

ब्रेकअपनंतर कंगना रणौतने आदित्य पंचोलीवर गंभीर आरोप केले होते. आदित्यने मारहाण केली होती, तो घरात कोंडून ठेवायचा, असं तिने म्हटलं होतं. तर हे सर्व आरोप फेटाळून लावत तिने आपले आर्थिक व भावनिक शोषण केले, असं आदित्य पंचोलीने म्हटलं होतं.