Aditya Seal and Anushka Ranjan Pregnancy Announcement: बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे आदिल्य सील व अनुष्का रंजन त्यांच्या कामामुळे, त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असते. आता मात्र या जोडप्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील एक खास गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
लग्नाच्या ४ वर्षांनंतर आदिल्य सील व अनुष्का रंजन यांनी दिली आनंदाची बातमी
आदित्य सील व अनुष्का रंजन यांनी २१ नोव्हेंबर २०२१ ला लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला आता जवळजवळ चार वर्षे झाली आहेत. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर ते आई-वडील होणार आहेत. अनुष्का प्रेग्नंट आहे. आदित्यने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचे आगमन होणार आहे.
आदित्यने सोशल मीडियावर त्याचे व अनुष्काचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आदित्यच्या शर्टवर बाप असे लिहिले आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनुष्का व आदित्यच्या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारही कमेंट्स करत आहेत. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनन्या पांडे, मौनी रॉय, भूमी पेडणेकर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, मनीष मल्होत्रा अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अनुष्का व आदित्य यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांनी जवळजवळ चार वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर आदित्यने अनुष्काच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी विचारले. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांनी ‘फितरत’ या वेब सीरिजमध्येसुद्धा एकत्र काम केले. या वेब सीरिजमध्ये क्रिस्टल डिसुजादेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. २०१९ ला ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.
आदित्य काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
