scorecardresearch

बॉलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

आदित्य ठाकरेंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर केलं भाष्य.

aditya thackeray talk about bollywood
आदित्य ठाकरेंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर केलं भाष्य. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

युवा आमदार आदित्य ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पर्यटन व पर्यावरण मंत्री होते. राजकारणाबरोबरच पर्यटन व पर्यावरण या विषयांमध्ये त्यांना रुची आहे. याबरोबरच बॉलिवूड क्षेत्राशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. अनेक सेलिब्रिटींशी त्यांचे मैत्रीपू्र्ण संबंध आहेत.

आदित्य यांचं नाव बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी जोडलं गेलं होतं. दिशा पटानी व आदित्य यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. आदित्य ठाकरेंनी नुकतीच ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली. ‘कर्ली टेल्स’च्या संडे ब्रंच या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या मुलाखतीत आदित्य यांनी दिशा पटानाशी असलेल्या रिलेशनशिपबाबत वक्तव्य केलं आहे. “बॉलिवूडमधील अभिनेत्रींबरोबर तुमचं नाव जोडलं गेल्याच्या अफवा होत्या. त्या खऱ्या असत्या तर…असं तुम्हाला वाटतं का?” असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “नाही. त्या सगळ्या अफवा आहेत. बॉलिवूड अभिनेत्री माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत”.

हेही वाचा>> Video: राखी सावंतचा ‘कार’नामा! आदिल खानला तुरुंगात पाठवल्यानंतर गाडीवरुन पुसलं पतीचं नाव, व्हिडीओ व्हायरल

सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणी आदित्य यांचं नाव घेण्यात आलं होतं. दिशाच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिशाच्या मृत्यूत आदित्यचा हात असल्याचं राणे म्हणाले होते.

हेही वाचा>> शिव ठाकरेला मुंबईत खरेदी करायचं आहे घर, म्हणाला “त्याशिवाय मला सेलिब्रिटी…”

आदित्य यांनी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजकारणापलिकडे अनेक गोष्टींवर चर्चा केली. मुंबईतील लाइफस्टाइल, प्रदुषण याबरोबरच शहरातील प्रसिद्ध व त्यांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणाबाबतही या मुलाखतीत भाष्य केलं. लहानपणीच्या अनेक आठवणीनीही आदित्य यांनी यावेळी सांगितल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 17:17 IST