Adnan Sami Pakistan Passport Indian Citizenship Reality: बॉलीवूडमधील लोकप्रिय झालेला गायक अदनान सामी याच्याकडे नक्की कोणत्या देशाचे नागरिकत्व आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमी उत्सुकता असते. १ जानेवारी २०१६ पासून अदनान सामीला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. यापूर्वी त्याच्याकडे पाकिस्तान देशाचे नागरिकत्व आणि पासपोर्ट होता, त्यामुळे संगीतकार व गायक अदनान सामीचा पाकिस्तानशी नक्की कसा संबंध आहे? याबाबत त्याने स्वतः खुलासा केला आहे.

अदनान सामीबद्दल त्याचे चाहते तो नक्की भारतीय आहे की पाकिस्तानी आहे, याबद्दल सर्च करत असतात. सध्या भारतीय नागरिकत्व असूनही अनेकांच्या मनात याबद्दल शंका आहे. याबाबत एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर अदनान सामीला तो भारतीय नागरिक आहे का असा प्रश्न विचारला होता. यावर तो म्हणाला, “खरंच, इतक्या वर्षांनंतर तुम्ही मला हा प्रश्न विचारणार आहात? तुम्हाला काय वाटतं?”

व्हिजिटर व्हिसावर भारतात आला अन्…

भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत गायक अदनान सामीला २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळालं. पण, त्यापूर्वीच तो भारतामध्ये राहण्यासाठी आला होता.. २००१ मध्ये तो पहिल्यांदा व्हिजिटर(पर्यटन) व्हिसावर भारतात आला, त्यावेळी तो पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट होता. मे २०१५ मध्ये त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत संपली. यानंतर त्याने भारतामध्येच स्थायिक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आणि अनेक वर्षांनंतर त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले.

अदनान सामी
अदनान सामी

याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, भारताचं नागरिकत्व घेण्याचा निर्णय पैशांसाठी घेतलेला नव्हता. पाकिस्तानमध्ये व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागत होता, यासाठी त्याने एकदा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडेही मदतीची विनंती केल्याचे मुलाखतीमध्ये नमूद केले होते.

Singer Adnan Sami giving savage reply to troll asking about his Indian citizenship and Pakistan passport
गायक अदनान सामी

अदनान सामीचे वडील अर्शद सामी खान यांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता, पण ते पाकिस्तान एअर फोर्समध्ये पायलट होते आणि नंतर त्यांनी राजनयिक म्हणूनही काम केले. २००९ मध्ये मुंबईत अर्शद सामी खान त्याचे निधन झाले. आता अदानान सामी हा भारतीय असून त्याने संगीतविश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.