scorecardresearch

गरोदर असताना हाय हिल्स घातले म्हणून आलिया पाठोपाठ बिपाशाही ट्रोल

नुकताच बिपाशाचा बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता.

गरोदर असताना हाय हिल्स घातले म्हणून आलिया पाठोपाठ बिपाशाही ट्रोल
actress troll wearing high heels

बॉलिवूडमधील आपल्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे बिपाशा बसू. बिपाशा बासूने अभिनेता करण सिंहबरोबर आपली लग्नगाठ बांधली. लवकरच या सेलिब्रिटी कपलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा-करणने काही महिन्यांपूर्वीच ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. सध्या दोघंही खूप आनंदात आहेत. अलिकडेच बिपाशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. नुकतंच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटी ट्रोल होणं हि आता नवीन बाब राहिली नाही. बिपाशा बसूने अलिकडेच अभिनेता अयाज खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला पती करण सिंग ग्रोवरसोबत हजेरी लावली होती. मात्र तिच्या ट्रोलिंगच कारण निघालं तिने घातलेले शूज. बिपाशाने या पार्टीत हाय हिल्सचे शूज घातले आधीच ती गरोदर असल्याने त्यात असे शूज घातल्याने ट्रोल करण्यात आले. अलिकडेच आलिया भटदेखील हाय हिल्समुले ट्रोल झाली होती. बिपाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लगेचच, नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, एकाने प्रतिक्रिया दिली की ‘हे लोक गरोदरपणातदेखील कसे काय असे हाय हिल्स शूज घालू शकतात’? तर एकाने लिहले आहे ‘गरोदरपणात असे शूज कोण घालत? डॉक्टर यांना काही सांगत नाही का’?

अभिनेत्री काजोलने पत्रकारांना लगावला टोला, म्हणाली, “तुम्ही काही कामाचे… “

नुकताच बिपाशाचा बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. बिपाशा करणने २०१६मध्ये थाटामाटात लग्न केलं. करणचं हे दुसरं लग्न आहे. आपल्या होणाऱ्या पतीचा भुतकाळ माहित असताना देखील बिपाशाने करणशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बिपाशा बसू मूळची दिल्लीची असून कोलकात्यामध्ये ती लहानाची मोठी झाली आहे. तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंगपासून केली आहे. अजनबी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘कॉर्पोरट, ‘फिर हेरा फेरी’, ‘ऑल द बेस्ट’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटात तिने काम केलं आहे. ती आपल्या फिटनेसकडे देखील लक्ष देत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या