आधी म्हणाली नवऱ्याचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर, धमकीही दिली, आता राखी सावंतचा युटर्न, म्हणते, "आदिलची बदनामी..." | after allegation on adil khan durrani rakhi sawant says now everything is ok we are together watch video | Loksatta

आधी म्हणाली नवऱ्याचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर, धमकीही दिली, आता राखी सावंतचा युटर्न, म्हणते, “आदिलची बदनामी…”

अभिनेत्री राखी सावंतचा नवा ड्रामा, आदिल खानवर आरोप केल्यानंतर राखीने काय केलं पाहा?

Rakhi sawant wedding rakhi sawant
अभिनेत्री राखी सावंतचा नवा ड्रामा, आदिल खानवर आरोप केल्यानंतर राखीने काय केलं पाहा?

अभिनेत्री राखी सावंत व आदिल खान दुर्रानीच्या लग्नाचा ड्रामा अजूनही सुरुच आहे. आईच्या निधनानंतर राखीने पुन्हा एकदा आदिलवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. नवऱ्याचं दुसऱ्याच एका मुलीबरोबर अफेअर असल्याचं राखीने सांगितलं. शिवाय दोघांचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिली. आता या सगळ्या प्रकरणानंतर राखीने युटर्न घेतला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : मराठमोळा शिव ठाकरे ग्रँड फिनालेपूर्वीच घराबाहेर पडणार? ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भडकले

राखीने आदिलवर गंभीर आरोप केल्यानंतर तो आता कायम माझाच आहे असं म्हटलं आहे. कामानिमित्त राखी घराबाहेर पडली असताना पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. तेव्हा राखी म्हणाली, “मी देशाच्या जनतेला हे सांगू इच्छिते की, माझा आदिल पुन्हा माझ्याजवळ आला आहे. माझ्या चेहऱ्यावर आज पुन्हा एकदा हास्य आलं आहे. आता आदिल व माझ्यामध्ये सगळं काही ठीक आहे.”

“आम्ही दोघं मिळून आता खूप काम करणार आहोत. आदिल व माझं नातं आता खूप चांगलं आहे हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे. आता यापुढे कोणतीच गडबड होणार नाही. नात्यामध्ये कधी काय बोलावं हे मला ठाऊक नव्हतं. माझ्या डोक्यावर बराच ताण होता. मी घाबरले होते. मी माझ्या आदिलची बदनामी नाही करणार. तो माझा नवरा आहे. कायम तो माझाच राहणार. तो कधीच कोणाकडे जाणार नाही.”

आणखी वाचा – विवाहित दिग्दर्शकावर जडलं होतं प्रेम, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पत्नीने उर्मिला मातोंडकरच्या कानाखाली मारली अन्…

आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे. तसेच आदिल व त्या मुलीचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकीही राखीने दिली होती. “आता माझी आईच नाही तर यापुढे कोणतीही गोष्ट गमवल्याचं मला दुःख होणार नाही. मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जेव्हा दीड महिना होती तेव्हा त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. आता मी त्या मुलीचं नाव सांगत नाही. पण वेळ आल्यावर मी त्या मुलीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करणार.” असं राखी म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 16:22 IST
Next Story
लॉजिकवरून ट्रोल करणाऱ्यांना ‘पठाण’च्या दिग्दर्शकाचे चोख उत्तर; ‘शोले’ चित्रपटाचं उदाहरण देत म्हणाले…