२०२३ वर्ष उजाडलं मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडत असताना एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी आता आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ मधून बॉलिवूडमधून पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारीया आदर जैनमुळे चर्चेत येत असते. आदरच्या मोठ्या भावाच्या लग्नात यांना एकत्र पाहण्यात आले होते. तसेच दोघे रणबीर कपूरच्या लग्नात आणि ख्रिसमस पार्टीतदेखील दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ब्रेकअपनंतरदेखील ते एकमेकांचे मित्र बनून राहणार आहेत.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

दोघांची ओळख त्याच्या एका कॉमन मित्राद्वारे २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघे एकत्र वेळ घालवू लागले होते. मात्र, चार वर्षांनंतर आता हे नाते तुटले आहे. आदर जैनने २०१७ मध्ये ‘कैदी बँड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. तारा सुतारिया नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तारा लवकरच ‘अपूर्व’ चित्रपटात दिसणार आहे