‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरीही या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘द केरला स्टोरी’ हा २०२३ मधील दुसरा चित्रपट ठरला. प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशी जादुई आकडा गाठत या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे सामान्य लोकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे तर दुसरीकडे काही लोक या चित्रपटावर टीका करताना दिसत आहे. नुकतंच तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनी या चित्रपटाचा ‘प्रोपगंडा’ म्हणत उल्लेख केला तर इतरही बऱ्याच कलाकारांनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हंटलं आहे. आता यात दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही उडी घेतली आहे. मध्यंतरी या चित्रपटावर बंदी यावी याविरोधात अनुरागने वक्तव्य देत या चित्रपटाला पाठिंबा दिला होता, आता मात्र त्यानेही या चित्रपटाला प्रचारकी म्हंटलं आहे.

आणखी वाचा : “मी हिंदी चित्रपटात काम करायचं बंद केलं कारण…” अभिनेते शरत सक्सेना यांचा मोठा खुलासा

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यप म्हणाला, “सध्याच्या काळात तुम्ही राजकारणापासून दूर राहू शकत नाही. एखादा चित्रपट अराजकीय असेल याची शक्यता फार कमी आहे. द केरला स्टोरीसारख्या बऱ्याच चित्रपटांना आपण प्रोपगंडा चित्रपट मानतो, कोणत्याही कलाकृतीवर बंदी घालण्याच्या मी विरोधात आहे, पण तो प्रोपगंडा चित्रपट आहे. एक फिल्ममेकर म्हणून मी असा चित्रपट बनवू शकत नाही, मला अॅक्टीव्हीस्ट व्हायची अजिबात इच्छा नाही. चित्रपट हा वास्तव, सत्य आणि तथ्य या तीन गोष्टींवर बेतलेला असतो.”

मध्यंतरी चित्रपटावर बंदीची मागणी होत असताना अनुरागने त्याविरोधात ट्विटरच्या माध्यमातून आवाज उठवला होता. नुकताच ‘कान्स २०२३ चित्रपट महोत्सवात’ अनुराग कश्यपच्या ‘केनडी’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग झालं. अनुरागच्या या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. यामध्ये राहुल भट आणि सनी लिओनी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After kamal haasan anurag kashyap calls the kerala story a propganda film avn
First published on: 29-05-2023 at 11:32 IST