"शाहरुख खान भारताचा..." 'पठाण' सुपरहिट ठरल्यानंतर किंग खानबाबत जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य | after pathaan movie success john abraham talk about shahrukh khan action scenes see details | Loksatta

“शाहरुख खान भारताचा…” ‘पठाण’ सुपरहिट ठरल्यानंतर किंग खानबाबत जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य

जॉन अब्राहमने शाहरुख खानबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला जॉन?

john abraham john abraham on shahrukh khan
जॉन अब्राहमने शाहरुख खानबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला जॉन?

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. ‘पठाण’चे शो अजूनही हाऊसफुल आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवसच झाले असले तरी ‘पठाण’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

आणखी वाचा – ‘पठाण’ची चर्चा असतानाही ‘वेड’ चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? रितेश देशमुखनेच सांगितली खरी आकडेवारी, म्हणाला…

दरम्यान या चित्रपटामध्ये शाहरुखसह जॉन अब्राहमच्या भूमिकेचीही जोरदार चर्चा सुरू आहे. जॉनने या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर या चित्रपटाची संपूर्ण टीम पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आली. यावेळी जॉनने शाहरुखबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाला जॉन अब्राहम?

“मला अ‍ॅक्शन हिरो म्हटलं जातं. पण आज मी सांगू इच्छितो की सध्या शाहरुख खान भारताचा नंबर वन अ‍ॅक्शन हिरो आहे.” असं जॉनने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. शिवाय त्याने शाहरुखच्या अ‍ॅक्शन सीन्सचं कौतुक केलं. यावेळी जॉनने त्याच्या चाहता वर्गाचे आभार मानले. त्याचबरोबरीने त्याने शाहरुख व दीपिकाच्या चाहत्यांचेही आभार मानले.

आणखी वाचा – ‘तू चाल पुढं’मध्ये काम करणाऱ्या अंकुश चौधरीच्या बायकोचं शिक्षण किती? स्वतःच खुलासा करत म्हणाली…

शाहरुखच्या ‘पठाण’ची चर्चा जगभरात आहे. देशभरात या चित्रपटाने २८० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात ५५० कोटी रुपये इतपत या चित्रपटाने कमावले आहेत. आता ‘पठाण’ आणखी किती रेकॉर्डब्रेक कमाई करणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:33 IST
Next Story
बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा दबदबा; ‘शेहजादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्याबाबतीत घेतला मोठा निर्णय