scorecardresearch

प्रियांका चोप्रानंतर बॉलिवूडमधील कंपूशाही आणि राजकारणाबद्दल गायक अमाल मलिकने सोडलं मौन; म्हणाला…

बॉलिवूडमधील तरुण गायक अमाल मलिक याने यावर भाष्य केलं आहे

amaal mallik about bollywood politics
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा ही सगळं सोडून हॉलिवूडमध्ये काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने ती चर्चेत आली. या राजकारणाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतल्याचं तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये खुलासा केला. यावर बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिली. आता पाठोपाठ बॉलिवूडमधील तरुण गायक अमाल मलिक याने यावर भाष्य केलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार अमाल मलिकने बॉलिवूडमधील राजकारणाबद्दल भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तो पोस्ट करत म्हणाला, “ही गोष्ट मी रोजच अनुभवतो. माझे चाहते मला विचारतात की मी बॉलिवूड चित्रपटांसाठी काम का करत नाही? यामागे खरं बघायला गेलं तर याला इथली कंपूशाही, तळवे चाटण्याची वृत्ती या गोष्टी कारणीभूत आहेत. बॉलिवूडने या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पहा यांनी प्रियांकासारख्या अभिनेत्रीबरोबर काय केलं आहे.”

आणखी वाचा : ठरलं! प्रभासचा ‘आदिपुरुष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केली घोषणा

प्रियांका चोप्रा या सगळ्या प्रकाराबद्दल म्हणाली, ” “मला बॉलिवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यापासून मी खूश नव्हते. मला ‘देसी हिट्स’च्या अंजली आचार्यने एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिल्यावर फोन केला होता. त्यावेळी मी ‘सात खून माफ’ची शूटिंग करत होते. तिने मला अमेरिकेत म्युझिक करिअर करण्यात तुला रस आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर मी बॉलिवूडमधूल काढता पाय घेण्याच्या तयारीत होते ही स्पष्ट केलं.”

याबरोबरच बॉलिवूडमध्ये तिला ज्यापद्धतीने वागणूक मिळाली याबद्दलही प्रियांका म्हणाली, “मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.” प्रियांकाच्या या वक्तव्याला विवेक अग्निहोत्री आणि कंगना रणौत यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 10:13 IST

संबंधित बातम्या