scorecardresearch

Video: ‘आदिपुरुष’ला मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे प्रभास दिग्दर्शक ओम राऊतवर चिडला?, व्हिडिओ व्हायरल

या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता प्रभास यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Video: ‘आदिपुरुष’ला मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे प्रभास दिग्दर्शक ओम राऊतवर चिडला?, व्हिडिओ व्हायरल

सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘आदिपुरुष’ चित्रपट आणि त्यातील व्हीएफएक्स, या चित्रपटातील सैफ अली खानने साकारलेली भूमिका, सैफचा या चित्रपटातील लूक या सगळ्यावर सोशल मीडियावरून प्रेक्षक खूप टिका करत आहेत. एकीकडे या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता प्रभास यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

आणखी वाचा : Video: करीना कपूरबरोबर घडली धक्कादायक घटना, एकाने केला खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्याने…

२ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा टीझर लॉंच करण्यात आला. परंतु हा टीझर पाहिल्यावर सुरुवातीपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेली उत्सुकता अगदीच नाहीशी झाली. तो टीझर प्रेक्षकांना आवडला नाही आणि त्यांनी या बिग बजेट चित्रपटावर टिका करण्यास सुरुवात केली. या टीझर लॉंचनंतरचा प्रभास एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत प्रभास ओम राऊतवर चिडलेला दिसत आहे. या व्हिडीओत प्रभास ओमला म्हणाला, “ओम तू माझ्या रूममध्ये येत आहेस. माझ्याबरोबर ये…” हा व्हिडिओ चित्रपटाच्या टीझर समोर आल्यानंतरचा आहे, असे बोलले जात आहे.

प्रभासची एकूणच देहबोली पाहता त्याला इतकं रागावलेलं कधीच पाहीलं नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. काहींच्या मते ‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज झाल्यानंतर ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्यामुळे प्रभास नाराज झाला आहे. काही बातम्यांनुसार असं सांगितलं जात आहे की, प्रभासने ओमला त्याच्या खोलीत ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनवर चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं.

हेही वाचा : प्रभासचे हिंदी चित्रपट आपटल्याने निर्मात्यांना पुन्हा आली शरद केळकरची आठवण, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

या चित्रपटात प्रभासच्या प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत तर क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा देवदत्त नागे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या