scorecardresearch

‘पठाण’च्या यशानंतर ‘पठाण २’ येणार! दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची मोठी घोषणा

Pathaan Movie: ‘पठाण’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

sidharth anand confirms pathaan 2
दिग्दर्शकाने केली 'पठाण २'ची घोषणा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील बहुचर्चित व बहुप्रतीक्षीत ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. शाहरुख खान, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसांतच या चित्रपटाने जगभरात ५४३ कोटींचा गल्ला जमवला. ‘पठाण’च्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी मोठी घोषणा केली आहे.

‘पठाण’ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने प्रसारमाध्यमांशी पहिल्यांदाच संवाद साधला. यावेळी “’पठाण’ नंतर आता बॉलिवूडमध्ये कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळणार?” असा प्रश्न दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’च्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. ‘पठाण २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सिद्धार्थ आनंद यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा>> विशाखा सुभेदारच्या डान्स व्हिडीओवर गणेश आचार्यांची कमेंट, अभिनेत्रीने भारावून शेअर केली पोस्ट, म्हणाली…

‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. या चित्रपटाने पाच दिवसांत देशांतर्गत ३३५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदही भारावून गेले आहेत.

हेही वाचा>> Video: अनुपम खेर व नर्गिस फाखरी यांनी मुंबईच्या डबेवाल्यांना वाढलं जेवण, व्हिडीओ व्हायरल

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. त्यामुळे ‘पठाण’साठी शाहरुखचे चाहते आतूर होते. आता सिद्धार्थ आनंद यांना ‘पठाण २’ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:38 IST