बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देतो आहे. रोहित शेट्टी हा त्याच्या स्टंटबाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये कलाकार खतरनाक स्टंट करताना दिसतात. तो स्वतःदेखील स्टंट करतो मात्र हेच त्याच्या जीवावर बेतलं. चित्रीकरणादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली असून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होत मात्र आता त्याची प्रकृती ठीक आहे.

रोहित सध्या त्याच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सीरिजचं चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू आहे. याच सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं होत, मात्र त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत सांगितलं “केवळ हातांवर टाके पडले आहेत. घाबरण्यासारखे काही नाही, मी बरा आहे. प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल खूप खूप धन्यवाद.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

या सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी पहिल्यांदाच वेबसीरिज या माध्यमात पदार्पण करणार आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यावर्षी ही सिरीज प्रदर्शित होईल असेही बोलले जात आहे.