scorecardresearch

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “दहशतवाद पीडितांना… “

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती

vivek final
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

भारतीय चित्रपट, दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३’ नुकताच रंगला. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळाला. या निमिताने चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ट्वीट करत आभार मानले आहेत.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने ज्याचं नाव संपूर्ण जगाला कळलं ते नाव म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. ज्यात ते असं म्हणतात “हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि भारतातील सर्व लोकांना ज्यांचे चित्रपटाला आशीर्वाद मिळाले आहेत.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Dadasaheb Phalke Award 2023 : आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणबीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

दरम्यान, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती. विवेक अग्निहोत्री सध्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहेत.

दरम्यान दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 14:52 IST
ताज्या बातम्या