Abhishek Bachchan Aishwarya Rai Video: ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटस्फोटांच्या अफवांनंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र दिसले. अभिषेक व ऐश्वर्या मुलगी आराध्याच्या शाळेतील अॅन्युअल डे कार्यक्रमाला आले होते. आराध्याचे आई-बाबाच नाही, तर तिच्या आजोबांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

आराध्या बच्चन बीकेसी येथील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतेय. याच शाळेत करीना कपूर खान, शाहिद कपूर, फराह खान, करण जोहर, दिपशिखा देशमुखसह अनेक सेलिब्रिटींची मुलं शिकतात. शाळेत अॅन्युअल डे फंक्शन आहे. त्यामुळे सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळतेय.

ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन दरवर्षी मुलीच्या शाळेत जातात. यंदाही दोघेही आले होते. त्याचबरोबर आराध्याची आजी म्हणजेच ऐश्वर्याची आई वृंदा राय व आराध्याचे आजोबा अमिताभ बच्चन नातीच्या शाळेत आले होते. वृंदा राय लेक व जावयाबरोबर आल्या होत्या. तर अमिताभ बच्चन बच्चन काही वेळाने तिथे आले होते.

Award Banner

इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या व्हिडीओत ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन वृंदा राय यांना सोबत घेऊन शाळेत जाताना दिसतात. ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर अभिषेक बच्चन निळ्या रंगाच्या पोशाखामध्ये होता. वृंदा राय यांनी मल्टिकलर ड्रेस घातला होता. या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतेय, असं म्हटलंय.

पाहा व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ वूम्प्ला या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन आराध्याच्या शाळेतून बाहेर पडतात आणि कारमध्ये बसतात. यावेळी मुलगा अभिषेक व सून ऐश्वर्या त्यांना कारपर्यंत सोडायला आले होते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अभिषेक व ऐश्वर्याचं कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, मागील दीड वर्षापासून अभिषेक व ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत होत्या. त्यामुळे दोघांचेही चाहते चिंतेत होते. पण आता अभिषेक व ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. दोघांनाही एकत्र पाहून आनंद झाला. बरं झालं ते दोघेही एकत्र आहेत, अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.