Aishwarya Rai Bachchan heads to Cannes 2026 : ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची सुरुवात यंदा १२ मे रोजी झाली होती. तर, या सोहळ्याची सांगता २३ मे रोजी होईल. या सोहळ्यादरम्यान सर्वाधिक चर्चा झाली ती ऐश्वर्या राय बच्चनची! गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या कान्सचं रेड कार्पेट गाजवतेय, ती L’Oréal Paris ब्रँडची ग्लोबल अॅम्बेसेडर म्हणून ओळखली जाते. मात्र, यंदा ‘ले मार्टिनेझ’ हॉटेल बाहेरील भव्य पोस्टरवरून ऐश्वर्याला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. ऐश्वर्याच्या कान्स उपस्थितीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
ऐश्वर्या राय दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही कान्सचं रेड कार्पेट गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती आपल्या लेकीसह कान्सला रवाना झाली आहे. ऐश्वर्या व आराध्या गुरुवारी रात्री उशिरा कान्सला निघाल्या. या दोघींचे एअरपोर्टवरील फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही एअरपोर्टवर ‘ऑल इन ब्लॅक’ लूकमध्ये आल्याचं पाहायला मिळाल्या. यावेळी आराध्याने आपल्या आईचा हात धरून एअरपोर्टवर एन्ट्री घेतली. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या मायलेकींचा लूक अन् या दोघींची हेअरस्टाइल अगदी सेम टू सेम वाटतेय. यादरम्यान आराध्याने एकदाही पापाराझीच्या कॅमेऱ्यांकडे पाहिलं नाही. ती आपल्या आईचा हात धरून, चेहऱ्यावर एक गोड स्माइल ठेवून शांतपणे चालत होती.
ऐश्वर्याने मात्र सगळ्यांना अभिवादन केलं. काही चाहत्यांबरोबर फोटो काढले आणि ही ‘कान्सची क्वीन’ आता फ्रान्ससाठी रवाना झाली आहे. कान्सच्या क्लोझिंग सेरेमनीला ऐश्वर्या उपस्थित राहणार आहे. आता यावर्षी ती रेड कार्पेटवर काय लूक करणार याकडे तिच्या लाखो चाहत्यांचं लक्ष असेल.
ऐश्वर्या सर्वप्रथम २००२ मध्ये ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरला कान्समध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्या पिवळ्या साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्यासह शाहरुख खान आणि ‘देवदास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सुद्धा तेव्हा रेड कार्पेटवर उपस्थित होते.
दरम्यान, ऐश्वर्याचा चाहतावर्ग जगभरात मोठ्या प्रमाणात आहे. मिस वर्ल्ड झाल्यावर तिने भारतीय चित्रपटसृष्टीला सुद्धा एक वेगळी ओळख मिळवून दिली. गेल्यावर्षी ऐश्वर्याने रेड कार्पेटवर Ivory रंगाची सुंदर साडी नेसली होती. तिच्या या लूकचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं होतं. आता ऐश्वर्या यावर्षी पारंपरिक की वेस्टर्न…रेड कार्पेटवर कोणत्या लूकची निवड करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
