‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. कलाकार या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. एक प्रमोशन इव्हेंट मुंबईत पार पडला, तिथे अभिनेता विक्रम व ऐश्वर्या राय बच्चन हजर होते. हम दिल दे चुके सनम चित्रपटानंतर ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये ऐश्वर्या नंदिनी नावाची भूमिका साकारत आहे. तिला या दोन्ही चित्रपटातील नावांच्या कनेक्शनबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने उत्तर दिलंय.

‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईचा वेग मंदावला, पाचव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

ऐश्वर्या म्हणाली, “काय योगायोग आहे. हे आश्चर्यकारक आहे ना? ‘हम दिल दे चुके सनम’मधली नंदिनी प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे, ती लोकांच्या हृदयात आहे आणि मी खूप आभारी आहे की मला नंदिनीची भूमिकाही करायला मिळाली. ती प्रेक्षकांसाठी आणि अर्थातच माझ्यासाठीही खास राहिली होती. ते संजय भन्साळी होते आणि आज माझ्या मणि सरांसाठी (मणिरत्नम) मला पोन्नियन सेल्वनमध्ये नंदिनीची भूमिका करायला मिळाली. अशा सशक्त स्त्रियांची भूमिका साकारायला मिळणे हा एक मोठा आशीर्वाद आहे आणि मी खूप खूप आभारी आहे.”

अमिताभ बच्चनच नाही तर चाहत्यांनी ‘या’ कलाकारांचीही बांधली मंदिरं, अंडरवर्ल्डशी संबंधांमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रीचाही समावेश

मणिरत्नम यांनी चित्रपटाची ऑफर दिल्यास मी कायम होकार देईल, असंही तिने सांगितलं. “हे स्वाभाविक आहे. जेव्हाही ते मला त्यांच्या चित्रपटात काम करायला विचारतील, तेव्हा मी हो म्हणेन. याला माझ्या गुरूंबद्दलचा आदर म्हणा, भक्ती म्हणा, श्रद्धा म्हणा, कृतज्ञता म्हणा किंवा प्रेम म्हणा. तुम्हाला हवं ते म्हणू शकता,” असं ऐश्वर्या मणिरत्मन यांच्याबरोबर काम करण्याबाबत म्हणाली.

‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्रिशा, प्रकाश राज, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलीपाला, जयराम, प्रभू, लाल आणि इतर अनेक कलाकार आहेत.