Aishwarya Rai Bachchan : गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. सेलिब्रिटी मंडळी देखील धुमधडाक्यात हा सण साजरा करताना दिसत आहेत. तसंच सेलिब्रिटी लोकप्रिय मंडळातील बाप्पाचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने आई आणि लेकीसह जीएसबीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
जीएसबीच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतरचे ऐश्वर्या राय-बच्चनचे ( Aishwarya Rai Bachchan ) व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ आणि ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये, ऐश्वर्या आपली आई वृंदा राय आणि आराध्याला सांभाळत गर्दीतून बाहेर जाताना पाहायला मिळत आहे. यावेळी ऐश्वर्या साध्या लूकमध्ये दिसली. तिने फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर तिची आई गुलाबी रंगाच्या साडीत पाहायला मिळाली. तसंच आराध्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. या तिघींचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. पण या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या व अभिषेक घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
“अभिषेक बच्चन कुठे आहे”, असं अनेक नेटकऱ्यांनी विचारलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, अभिषेक बच्चन तुमच्याबरोबर नाही आला? तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “नक्कीच घटस्फोट झाला आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आता अभिषेक यांच्याबरोबर दिसत नाही.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, इथेही कुटुंबाबरोबर नाही. अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
हेही वाचा – Video: गणपतीच्या नैवेद्यावरून चारुलताबरोबर अधिपतीचा वाद, म्हणाला, “आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली परंपरा…”
दरम्यान, गेल्या कित्येक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेक एकत्र न दिसल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात ऐश्वर्या व बच्चन कुटुंब एकत्र दिसलं नाही. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक वाव मिळाला. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या ( Aishwarya Rai Bachchan ) फक्त अभिषेकलाच फॉलो करते. बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याला फॉलो करत नाही. सासरे अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या फॉलो करत नाही आणि त्यांच्याबरोबर ती जास्त दिसतही नाही. कोणताही कार्यक्रम असो ऐश्वर्या सासरच्यांपासून दूर-दूर असते.