ऐश्वर्या रायने तिच्या २८ वर्षांच्या करिअरमध्ये ५० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्याने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तिने फक्त बॉलीवूडच नाही तर दाक्षिणात्य व बंगाली सिनेमेही केले. १९९७ साली आलेला ‘इरुवर’ हा ऐश्वर्या रायचा पदार्पणाचा चित्रपट होता. नंतर तिने ‘और प्यार हो गया’मधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. २००३ मध्ये ऐश्वर्याने एक बंगाली चित्रपट केला होता. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळालं होतं. या चित्रपटात ऐश्वर्या रायचे बोल्ड सीन्स होते.

ऐश्वर्या राय बच्चनने या हिट चित्रपटात एका विधवेची भूमिका केली होती. यात तिने बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जीबरोबर इंटिमेट सीन्स केले होते. ऐश्वर्या रायच्या या चित्रपटाचे नाव ‘चोखेर बाली’ आहे. हा बंगाली चित्रपट आहे. ऋतुपर्णो घोष दिग्दर्शित हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘चोखेर बाली’ कादंबरीवर आधारित आहे.

‘चोखेर बाली’मध्ये ऐश्वर्याने अनेक बोल्ड व इंटिमेट सीन्स केले होते. या सिनेमात समाजातील कुप्रथा व विधवांबरोबर होणाऱ्या वाईट वर्तणुकीवर भाष्य करण्यात आलं आहे. ऐश्वर्या रायने या सिनेमात बरेच किसिंग व इंटिमेट दिले होते. ज्याची प्रचंड चर्चा झाली होती. या चित्रपटाचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं.

‘चोखेर बाली’ची कथा

ऐश्वर्या रायने ‘चोखेर बाली’मध्ये बिनोदिनी नावाच्या तरुणीची भूमिका केली होती. ती एक सुशिक्षित तरुणी असते. आजारपणामुळे तिच्या पतीचे निधन होते. काही दिवस ती माहेरी राहते, नंतर ती नातेवाईकांकडे जाते. तिथे तिची भेट महेंद्र नावाच्या मेडिकल प्रॅक्टिशनरला भेटते. महेंद्रची भूमिका प्रोसेनजीत चटर्जीने केली होती. महेंद्रचं लग्न बिनोदिनीची जवळची मैत्रीण आशालताशी होतं. पण नंतर महेंद्रला वाटतं की बिनोदिनी आधुनिक विचारांची आहे, तर त्याची पत्नी जुन्या विचारांची आहे. तसेच आशालताला तिचा मित्र बेहारी आवडतो, असंही महेंद्रला वाटत असतं.

‘चोखेर बाली’मध्ये नात्यातील चढ-उतार, सामाजिक प्रथा, नात्यांमधील भावनिकता या गोष्टी या गोष्टी पाहायला मिळतात. या चित्रपटात ऐश्वर्या रायसाठी श्रीलीला मजुमदारने डबिंग केलं होतं. यात रायमा सेनदेखील होती. बंगालमध्ये ऐश्वर्या रायचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.