Aishwarya Rai- Aradhya Bachchan Video: कलाकार आणि त्यांच्या मुलांना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. काहीवेळा विविध कार्यक्रमांना ते त्यांच्या मुलांना घेऊन येतात. काही खास वेळी आपल्या आवडत्या कलाकारांच्या मुलांची झलक पाहण्याची संधी चाहत्यांना मिळते. विशेष म्हणजे कलाकारांचा जितका मोठा चाहतावर्ग असतो, तितकाच मोठा त्यांच्या मुलांचाही चाहतावर्ग असतो. त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
यामध्ये आलिया भट्ट-रणबीर कपूरची मुलगी राहा, करीना कपूर-सैफ अली खानची मुले तैमुर व जेह, बिपाशा बासूची मुलगी देवी या आणि अशा सर्व स्टारकिड्सचा मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांच्यातील बॉण्डिंग वेळोवेळी लक्ष वेधून घेत असते. ऐश्वर्या राय जगभरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. त्यावेळी तिच्याबरोबर तिची मुलगीदेखील असते. ती कायम तिच्या आईबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते. त्यांच्यातील बॉण्डिंगचे नेहमीच कौतुक होताना दिसते. चाहत्यांचे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात.
ऐश्वर्या राय मुलीसाठी बनली फोटोग्राफर
आता ऐश्वर्या व आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. आराध्या शाळेच्या सहलीसाठी गेली होती. ती तिच्या मुलीच्या येण्याची वाट पाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, आराध्या दिसल्यानंतर ऐश्वर्या तिच्याकडे जाते आणि आराध्या धावत येऊन तिला प्रेमाने मिठी मारते. इतकेच नाही तर, ऐश्वर्या तिच्या मुलीचे फोटोही काढत असल्याचे दिसते. तसेच, तिच्या मित्रमैत्रींणींबरोबरदेखील ती फोटो काढते. व्हिडीओच्या शेवटी ऐश्वर्या व आराध्या एकमेकींचा हात हातात घेऊन जातात.
ऐश्वर्या रायने एप्रिल २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनबरोबर लग्नगाठ बांधली. २०११ ला त्यांना मुलगी झाली. नुकतीच त्यांच्या लग्नाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने अभिषेक व आराध्यसह एक फोटो शेअर केला होता.
अभिषेक वेळोवेळी त्याच्या कुटुंबाबद्दल व्यक्त होताना दिसतो. ऐश्वर्या व आराध्याबद्दलही तो मोकळेपणाने बोलतो. आताची पीढी खूप प्रामाणिकपणे त्यांची मते व्यक्त करते, असेही अभिषेकने काही मुलाखतींमध्ये म्हटले आहे.
