ऐश्वर्या राय म्हणजे एके काळची विश्वसुंदरी. हा किताब जिंकल्यानंतर तिने चित्रपटांमध्येही करिअर केलं आणि ती यशस्वी अभिनेत्रीही झाली. अभिषेक बच्चनशी लग्न झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये कामं करणं काही प्रमाणात कमी केलं. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होईल अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान एका पाकिस्तानी मौलवीने ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानचा मौलवी मुफ्ती अब्दुल काय म्हणाला?

पाकिस्तानचा मौलवी मुफ्ती अब्दुल कावीचा हा व्हिडीओ समोर आला आहे. जो एका पॉडकास्टमधला आहे. अब्दुल कावी म्हणतो, “अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट व्हावा अशी माझी इच्छा नाही. पण जर त्या दोघांचा घटस्फोट झाला तर ऐश्वर्या राय मला लग्नासाठी मेसेज करेल. मी ऐकलं आहे की ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात खटके उडत आहेत. मी कुणाचंही वाईट चिंतणारा नाही. पण जर दोघं विभक्त झाले तर दोन ते चार महिन्यांतच ऐश्वर्या माझ्याशी निकाह करेल. तसा निरोप ती मला धाडेल. जर ऐश्वर्याकडून असा निरोप आला तर मी आधी तिला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावेन तिचं नाव आयेशा ठेवेन आणि मग तिच्याशी निकाह करेन. मजा येईल असं करायला. ” पाकिस्तानच्या मौलवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राखी सावंत बाबत काय म्हणाला होता कावी?

मुफ्ती कावीने केलेलं हे पहिलं विधान नाही. याआधी त्याने अभिनेत्री राखी सावंतसह लग्न करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. १४ फेब्रुवारीला आम्ही लग्न करु असं हा मुफ्ती म्हणाला होता. कावी म्हणाला होता की राखीने स्वतःच ही तारीख निवडली आहे. मात्र राखीने हे सगळे दावे फेटाळले होते. राखी म्हणाली होती त्या माणसाला (मुफ्ती कावी) सहन करणं कल्पनेच्या पलिकडचं आहे त्याच्याशी निकाहचा विचारही मी करु शकत नाही.

Award Banner
Aishwarya Rai News
ऐश्वर्या रायबाबत पाकिस्तानच्या मौलवीचं वादग्रस्त वक्तव्य. नेमकं हे प्रकरण काय आहे?

नेटकऱ्यांचा संताप

मुफ्ती अब्दुलच्या या वक्तव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. काही लोकांनी हा मूर्ख माणूस काहीही बडबडतो आहे असल्या लोकांचे पॉडकास्ट कशाला करता असा सवाल केला आहे. तसंच काहींनी तुझी लायकी आहे का? म्हणत व्हायरल व्हिडीओच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. युट्यूब आणि ट्वीटरवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.