Aishwarya Rai Salman Khan Breakup : बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या ब्रेकअपमध्ये सलमान खान व ऐश्वर्या राय यांच्या जोडीचे नाव हमखास येते. त्यांची लव्ह स्टोरी जेवढी चर्चेत राहिली, तेवढेच त्यांचे वेगळे होणेही सर्वांना थक्क करणारे होते. सलमान व ऐश्वर्याच्या जोडीचे अनेक चाहते होते. मात्र, त्यांनी नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र, वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेल्या या घटनेने ऐश्वर्याने तिच्या प्रोफेशनल कामामध्ये कोणताही फरक पडू दिला नसल्याचे अभिनेत्री सादिया सिद्दीकी यांनी नमूद केले. सादिया व ऐश्वर्या यांनी ‘शब्द’ या चित्रपटामध्ये एकत्रित काम केले होते. याच दरम्यान, ऐश्वर्याचा ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात असून ऐश्वर्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम कामावर होऊ दिला नसल्याचा दावा सादिया यांनी केला आहे

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सादिया सिद्दीकी यांनी सिनेविश्वातील आठवणींना उजाळा दिला. तसेच ऐश्वर्या रायसह काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. सादिया म्हणाल्या, खरं तर माझा आणि ऐश्वर्याचा एकही सीन एकत्र नव्हता, त्यामुळे ती त्या काळात नेमकी काय अनुभवत होती हे मला कधीच जवळून समजलं नाही. माझी तिच्याशी वैयक्तिक ओळखही नाही. पण, तिच्या वैयक्तिक नात्यांचा परिणाम तिने तिच्या सेटवरील कामावर कधीही होऊ दिला नाही. तिने घेतलेले काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून तिच्या अभिनयासाठी व कामासाठी ती पूर्ण समर्पितपणे काम करते.

तिचे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम

त्या पुढे म्हणाल्या, “मी जे काही पाहिलं, त्यावरून ऐश्वर्याने तिच्या भावना अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांपासून लपवून ठेवल्या होत्या. ती नेहमी पूर्ण तयारीनिशी सेटवर यायची. तिचे सर्व डायलॉग तिला पाठ असायचे, चित्रपटाची पूर्ण पटकथा तिने वाचलेली असायची आणि अत्यंत व्यावसायिक पद्धतीने ती काम करायची. तिच्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम तिने कधीच तिच्या कामावर होऊ दिला नाही.”

सादिया सिद्दीकी यांनी ऐश्वर्या रायच्या भूमिकांचे आणि अभिनयाचे कौतुक केले. तसेच प्रत्येक भूमिकेसाठी बारकाईने तयारी व मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘शब्द’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन लीना यादव यांनी केले असून यामध्ये संजय दत्त, ऐश्वर्या राय बच्चन आणि झायेद खान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. रोमँटिक आणि थ्रिलर असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती.

सलमान खान व ऐश्वर्या राय यांचं अफेअर

सलमान खान व ऐश्वर्या राय यांचं एकेकाळी अफेअर होतं. ऐश्वर्याच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत, तरीही तिच्या २५-२६ वर्षांपूर्वीच्या अफेअरची आजही चर्चा होते. सलमान खान व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, आजही त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा केली जाते. संजय लीला भन्साळी यांच्या सुपरहिट ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर हे दोघे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे बनले. त्यांच्या लग्नाच्या चर्चाही जोरात रंगल्या होत्या. मात्र, २००२ मध्ये ऐश्वर्या राय यांनी हे नाते संपल्याची अधिकृत घोषणा केली होती.