Aishwarya Rai-Salman Khan viral video: ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांतदेखील काम केले आहे. अभिनेत्रीने १९९७ ला ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये बॉबी देओल प्रमुख भूमिकेत दिसला होता. ‘आ अब लौट चले’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘ताल’, ‘देवदास’, ‘अलबेला’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘कुछ ना कहो’, असे अनेक चित्रपट गाजले. अभिनेत्रीची जितकी तिच्या चित्रपटांमुळे चर्चा झाली, तितकीच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील ती चर्चेत आली.
ऐश्वर्या राय व सलमान खानचा व्हिडीओ
सलमान खानबरोबर तिचे नाव जोडले गेले. मात्र, जेव्हा ते वेगळे झाले तेव्हाही मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. अभिनेत्रीने अभिषेक बच्चनबरोबर २० एप्रिल २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. अभिषेक बच्चन व ऐश्वर्याला २०११ मध्ये मुलगी झाली. तिचे नाव आराध्या असे आहे.सलमान खान अविवाहित आहेत. कलाकार आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी त्यांच्या भूतकाळाबद्दल, रिलेशनशिपबद्दल अनेकदा बोलले जाते.
आता ऐश्वर्या व सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा व्हि़डीओ २६ वर्षांपूर्वीचा आहे. सहारा पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे.
ऐश्वर्या व सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला हम दिल दे चुके सनम हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील गाण्यावर त्यांनी पुरस्कार सोहळ्यात डान्स केला होता. ‘चाँद छुपा बादल में’ या गाण्यावरील त्यांचा डान्स लक्ष वेधून घेत आहे. तसेच, याच व्हिडीओमध्ये त्यांनी आणखी एका गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
A Blast from the past ?
— Being Arun (@Paneerbhujia) March 10, 2026
When Salman & Aishwarya performed together at Sahara Awards ? ❤️? pic.twitter.com/KVegXGaqXh
हॅलो ब्रदर चित्रपटातील तेरी चुनरिया दिल ले गई या गाण्यावर देखील ते डान्स करत आहेत. ऐश्वर्याने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून सलमानने पिवळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
ऐश्वर्या व अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या. मात्र, अभिषेक व ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात. त्यामुळे या चर्चा अफवा असल्याचे समोर आले. अभिषेक व ऐश्वर्या यांच्याबरोबरच त्यांची मुलगी आराध्यादेखील अनेकदा चर्चेत असते. ती अनेक कार्यक्रमांना तिच्या आईबरोबर हजेरी लावते. त्यावेळी त्यांच्यातील बॉण्डिंगचे कौतुक होताना दिसते.
सलमान खानबद्दल बोलायचे तर सलमान खान विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. तसेच, तो बिग बॉस या रिअॅलिटी शोचे देखील सूत्रसंचालन करत असतो. त्यामुळे त्याची चर्चा होताना दिसते.
दरम्यान, सलमान खान लवकरच बॅटल ऑफ गलवान, राजा शिवाजी या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
