५२व्या वर्षीही तब्बू अविवाहित, विवाहित सुप्रसिद्ध अभिनेत्याला करत होती डेट
सध्या सगळीकडेच अजय देवगण व तब्बूची मुख्य भूमिका असलेल्या ‘भोला’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अजयसह तब्बूच्या भूमिकेचंही विशेष कौतुक होताना दिसत आहे. तब्बूने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तब्बू तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. अजूनही ती अविवाहितच आहे. पण तिचं नाव कलाक्षेत्रातील काही मंडळींशी जोडलं गेलं.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
‘प्रेम’ चित्रपटामध्ये तब्बूसह संजय कपूरही मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तब्बू व संजय यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. दोघं एकमेकांना डेट करत होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संजय यांनी म्हटलं होतं की, “मी सुरुवातीला तब्बूला डेट करत होतो. पण चित्रपटाचं चित्रीकरण जसं संपत आलं तसं आमच्यामधील संवादही कमी होत गेला”.
त्याचबरोबरीने दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाबरोबरही तब्बूचं नाव जोडलं गेलं. ‘जीत’ चित्रपटाच्यादरम्यान साजिद व तब्बू एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार, साजिदवर तब्बूचं जीवापाड प्रेम होतं. पण साजिद त्यावेळी त्याची दिवंगत पत्नी दिव्या भारतीला विसरु शकत नव्हता. दरम्यान तब्बूला ही गोष्ट समजताच दोघांच्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली.
साजिदनंतर तब्बू दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन अक्किनेनीच्या प्रेमात पडली. नागार्जुन विवाहित असताना तब्बू त्याला डेट करत होती. जवळपास १० वर्ष तब्बू व नागार्जुनचं अफेअर होतं. पण नागार्जुन त्याच्या पत्नीला कधीच सोडणार नाही हे तब्बूच्या लक्षात आलं. तब्बूच्या या नात्याचाही दी एण्ड झाला. तब्बू माझी चांगली मैत्रीण आहे असं नागार्जून यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. पण ५२व्या वर्षीही तब्बू अविवाहितच आहे.