बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असलेला अभिनेता अजय देवगण याचा आज वाढदिवस. गेली अनेक वर्ष तो त्याच्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. आतापर्यंत त्याने प्रेक्षकांना अनेक उत्तम उत्तम चित्रपट दिले. आज त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या त्याच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने प्रेक्षकांचं प्रेम तर मिळवलंच पण त्याचबरोबर मोठी संपत्तीही कमावली.

अजय एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी मानधन आकारतो. याबरोबरच जाहिरातीमध्ये काम करण्यासाठीही तो कोटींच्या घरात पैसे घेतो. मीडिया रिपोर्टनुसार, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी अजयने ११ कोटी मानधन घेतलं होतं. तर एस एस राजामौलींच्या ‘आरआरआर’मध्ये साकारलेल्या छोट्याशा भूमिकेसाठी अजय देवगणने २५ कोटी आकारले.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

आणखी वाचा : ‘दृश्यम २’पाठोपाठ ‘भोला’ चित्रपटासाठीही अजय देवगणने आकारलं मोठं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क

मुंबईमध्ये त्याची दोन आलिशान घरं आहेत. जुहूमध्ये एक मोठा फ्लॅट आणि मालगडी रोडवर एक आलिशान बंगला आहे. या दोन्ही घरांची किंमत २५ कोटींहून अधिक आहे. मुंबईबाहेरही त्याचं फार्महाऊस आणि काही जागा आहेत. तर अजयने विविध व्यवसायांमध्येही पैसे गुंतवले आहेत. याबरोबरीने अजयला गाड्यांचं प्रचंड वेड आहे. त्याच्याकडे टोयोटा सलीका, बीएमडब्ल्यू, फरारी अशा महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

हेही वाचा : “आई-वडील असताना संस्कारी अन् ओरिबरोबर…” न्यासा देवगण ‘त्या’ व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ट्रोल

महागड्या गाड्या, आलिशान घरं, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक हे सर्व मिळून अजय देवगणची एकूण संपत्ती २४७ कोटी आहे.