scorecardresearch

Premium

Maidaan Teaser : अजय देवगणच्या ‘मैदान’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; भारतीय फुटबॉलच्या जनकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता

‘मैदान’ हा चित्रपट भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण काळावर आधारित आहे

ajay devgan maidaan teaser
फोटो : व्हिडिओतून स्क्रीनशॉट

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘मैदान’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता पण कोरोना महामारीमुळे त्याचे प्रदर्शन सतत पुढे ढकलले जात होते. आता अखेर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. भारतीय संघाने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले तेव्हा स्वातंत्र्यानंतरच्या फुटबॉलच्या सुवर्ण टप्प्याबद्दल हा चित्रपट भाष्य करतो.

अजय देवगणने त्याच्या ‘भोला’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्याचा टीझर रिलीज केला आहे. यादरम्यान अजयने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “११ जण मैदानात प्रवेश करतील, पण दिसेल एकच.” या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण सीझन ८’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पठाण’ आणि ‘पुष्पा’ लावणार हजेरी?

‘मैदान’ हा चित्रपट भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण काळावर आधारित आहे. या चित्रपटातील अजयची व्यक्तिरेखा भारतीय फुटबॉलचे जनक म्हणून ओळखले जाणारे महान प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर बेतलेली आहे. रहीम हे १९५० ते १९६३ या कालावधीत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक होते. या काळातील कथाही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

‘मैदान’ हा चित्रपट २३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १२ कोटीचा गल्ला जमवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘भोला’नंतर अजयच्या या ‘मैदान’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. त्यांना हा टीझरही पसंत पडला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 18:49 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×