scorecardresearch

Premium

Bholaa Movie leaked : अजय देवगणची चिंता वाढली; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘भोला’ झाला लीक

अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे

ajay devgn bholaa online leaked
भोला चित्रपट ऑनलाईन लीक (फोटो : सोशल मीडिया)

Bholaa Movie leaked : ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड आगामी ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या होत्या. ‘दृश्यम २ ‘च्या सुपर-सक्सेसनंतर, अजय पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगणच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलरबद्दल रिलीजपूर्वी बरीच चर्चा होती. एवढंच नाही तर भोलाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

नुकताच ‘भोला’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला मिश्र प्रतिसाद दिला आहे. अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १२ कोटीची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी एक वाईट बातमीदेखील समोर आली आहे. काही मीडिया रीपोर्टनुसार ‘भोला’ हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Rajveer Deol Paloma-starrer Dono box office collection day 1
सनी देओलचा मुलगा अन् पूनम ढिल्लोंच्या मुलीचं बॉलीवूड पदार्पण, राजवीर-पलोमाच्या ‘दोनों’ने कमावले फक्त ३० लाख रुपये
Fukrey 3 Day 1 collection
‘फुकरे ३’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी ‘व्हॅक्सिन वॉर’ला मागे टाकत कमावले ‘इतके’ कोटी
Shiv (2)
शिव ठाकरेला VIP रांगेतून लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याची खंत, म्हणाला, “जे लोक काही तास रांगेत थांबलेले असतात…”
shivang chopra post for sister parineeti chopra and raghav chadha wedding
“या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

आणखी वाचा : Bholaa Movie review : अजयचा जबरदस्त अंदाज, तब्बूचा पोलिसी खाक्या, जबरदस्त ॲक्शनची मेजवानी असलेला ‘भोला’

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अजय देवगणचा ‘भोला’ एचडी क्वालिटीमध्ये लीक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर बऱ्याच पायरेट साइट्सवर हा चित्रपट उपलब्ध असल्याचा दावाही काही लोकांकडून केला जात आहे. या गोष्टीचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला चांगलाच फटका बसू शकतं असं म्हंटलं जात आहे.

यामुळे अजय देवगण आणि निर्मात्यांची चिंता वाढली आहे. ‘भोला’च्या आधी रणबीर कपूरचा ‘तू झूठी मै मक्कार’ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ही अशाचप्रकारे ऑनलाईन लीक करण्यात आला होता. या पायरसीमुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान होत आहे. अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajay devgan tabu starrer bholaa movie online leaked as per media reports avn

First published on: 30-03-2023 at 15:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×