Ajay Devgn Car Collection: अजय देवगणने नुकताच त्याचा ५७वा वाढदिवस साजरा केला. २ एप्रिलला कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराबरोबर अभिनेत्याने त्याचा वाढदिवस साजरा केला.

५७ व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने स्वत:लाच एक भेट दिली आहे. आता अजय देवगणने स्वत:लाच कोणती भेटवस्तू दिली आहे हे जाणून घेऊ…

अजय देवगणने खरेदी केली महागडी Mercedes-Benz V-Class कार

अजय देवगणने मर्सिडीज-बेंज V-Class ही कार खरेदी केली आहे. अजय देवगणच्या या गाडीचा रंग काळा आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेता त्याची नवीन कार घेण्यासाठी गेल्याचे दिसत आहे.

Award Banner

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या गाडीची किंमत १.४ कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे अजय देवगणकडे आधीपासून एकापेक्षा एक गाड्या आहेत.

अजय देवगणकडे कोणत्या कार आहेत?

टाइम्स ऑफ इंडियानुसार, त्याच्याकडे ७ कोटींची रोल्स-रॉयस कलिनन (Rolls-Royce Cullinan), ३ कोटींची Mercedes Maybach, दोन कोटींची BMW X7 आणि १.८ कोटींची मर्सिडीज बेंज एस ४५० अशा लग्जरी गाड्यांचे कलेक्शन आहे.

अजय देवगण व काजोल अनेकविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. विविध मुलाखतींमधील त्यांची वक्तव्ये लक्ष वेधून घेतात. अजय देवगण विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्याच्या भूमिकांचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

काही दिवसांपूर्वी अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘दे दे प्यार दे २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमात अभिनेता आर. माधवन व अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. अंशुल शर्मा याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

आता अभिनेता लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धमाल ४’ या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अर्शद वारसी, संजय मिश्रा, रितेश देशमुख, जावेद जाफरी हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा ३ जुलै २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.

‘धमाल ४’बरोबरच अजय देवगण ‘गोलमाल ५’, ‘रेंजर’ आणि ‘दृश्यम ३’ या सिनेमातदेखील दिसणार आहे.