Upcoming Movie Releases October 2026: ऑक्टोबर २०२६ मध्ये अनेक नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’चाही समावेश आहे. ‘दृश्यम ३’बरोबरच इतरही अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते कोणते चित्रपट आहेत आणि ते कधी प्रदर्शित होणार आहेत, याबद्दल जाणून घेऊयात…
‘दृश्यम ३’
‘दृश्यम ३’मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता ‘दृश्यम ३’ काय कमाल करणार, प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘दृश्यम द कन्क्लुजन’ म्हणजेच ‘दृश्यम ३’चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. अजय देवगणसह तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर व इशिता दत्ता हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. जयदीप अहलावत आणि प्रकाश राज हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रेम कीटाणु
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्काय फोर्स’नंतर वीर पहारिया एका वर्षानंतर ‘प्रेम कीटाणु’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटसुद्धा २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
उडता तीर
आकाश कौशिक दिग्दर्शित ‘उडता तीर’ हा एक विनोदी चित्रपट आहे. त्यात एका पाकिस्तानी गुप्तहेराची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तसेच आयुष्मान खुराना, सारा अली खान, राम कपूर, राहुल बोस, सुहेल नय्यर, गुलशन ग्रोव्हर, मुकुल देव, सुप्रिया पिळगांवकर व स्मिता तांबे हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. हा सिनेमा ९ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम
प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्जवल निकम हा उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक सिनेमा आहे. सिनेमात उज्ज्वल निकम यांची भूमिका राजकुमार राव यांनी भूमिका साकारली आहे. हा सिनेमा १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
नई नवेली
नई नवेली या सिनेमातून यामी गौतम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बालाजी मोहन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
त्याबरोबरच पहला प्यार दुसरा बार हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. २३ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
