scorecardresearch

अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक, ट्वीट करत म्हणाला…

‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील अक्षय कुमारचा लूक समोर आल्यानंतर अजय देवगणने केलेलं ट्वीट चर्चेत

अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक, ट्वीट करत म्हणाला…
अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून अक्षय कुमारचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील अक्षय कुमारचा शिवरायांच्या वेशातील लूक समोर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने एक ट्वीट केलं आहे. चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा फोटो पोस्ट करत अजय देवगणने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> डोक्यावर पगडी, हातात भाला, ढाल अन्…; गायिका आर्या आंबेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

“छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आवडते मराठा योद्धा आहेत. या महापुरुषाच्या सन्मानार्थ आणखी एक चित्रपट बनवला जात आहे, याबद्दल आनंद आहे” असं अजय देवगणने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने अक्षय कुमारलाही टॅग केलं आहे.

हेही वाचा>> “मी आज अरबाजमुळेच…” पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मलायका अरोराने केलेलं वक्तव्य चर्चेत

अजय देवगणने ‘तान्हाजी’ या चित्रपटात शूरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. सध्या तो ‘दृश्यम २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:11 IST

संबंधित बातम्या