"अचानक ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली आणि..." अजय देवगणने सांगितली खऱ्या आयुष्यातील घडलेली घटना | Ajay Devgn reveals why he does not use elevators and the reason behind it nrp 97 | Loksatta

“अचानक ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली आणि…” अजय देवगणने सांगितली खऱ्या आयुष्यातील घडलेली घटना

“त्या घटनेपासून मला लिफ्टमध्ये पाय ठेवायलाही प्रचंड भीती वाटते.”

“अचानक ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली आणि…” अजय देवगणने सांगितली खऱ्या आयुष्यातील घडलेली घटना

बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या दृश्यम २ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘दृश्यम २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. ‘दृश्यम २’चे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत. नुकतंच अजय देवगणने त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल सांगितले आहे.

अभिनेता अजय देवगण हा ऑनस्क्रीनवर विविध स्टंट्स करताना दिसतो. नुकताच तो ‘द कपिल शर्माच्या शो’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने अनेक गप्पा मारल्या. यावेळी अजय देवगण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी कपिलने अजयला तुला कशाची भीती वाटते असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने मला लिफ्टची भीती वाटते, असे सांगितले. “मला बंदिस्त असलेल्या छोट्या जागा अजिबात आवडत नाहीत. मला त्या ठिकाणी जायला भिती वाटते कारण माझ्याबरोबर या अशा जागेत काही वाईट घटना घडल्या आहेत. ज्याचा माझ्यावर अजूनही प्रभाव आहे.” असेही तो म्हणाला.
आणखी वाचा :

“एकदा मी आणि माझा मित्र कामासंदर्भात लिफ्टमध्ये होतो. तेव्हा अचानक ती लिफ्ट थांबली आणि त्यानंतर ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळली. आम्ही दोघंही जवळपास दीड-दोन तास त्या लिफ्टच्या आत अडकलो होतो. त्या घटनेपासून मला लिफ्टमध्ये पाय ठेवायलाही प्रचंड भीती वाटते. मी कधीही कुठेही लिफ्टचा वापर करत नाही. मला कोणत्याही मजल्यावर जायचे असल्यास मी पायऱ्या चढूनच जातो. तो पर्यायच माझ्यासाठी उत्तम आहे”, असे त्याने सांगितले.

दरम्यान अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजयने साकारलेल्या विजय साळगावकर या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या चित्रपटातील अजयच्या कामाचं खूप कौतुकही केलं गेलं. ‘दृश्यम २’मध्ये विजय साळगावकर ही भूमिका साकारण्यासाठी अजयने ३० कोटी रुपये मानधन आकारलं आहे. हे मानधन चित्रपटातील इतर कलाकारांच्या मानधनापेक्षा अनेक पटींना जास्त आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 08:58 IST
Next Story
करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार