Raid 2 Advance Booking Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सिकंदर’, ‘जाट’, ‘केसरी चॅप्टर २’, ‘फुले’, ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटांचा बोलबोला सुरू आहे. पण, या चित्रपटांना पाहिजे तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या ‘रेड २’ चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. कारण अ‍ॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे.

‘रेड २’ चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून गेल्या २४ तासांत ११६ टक्क्यांच्या वेगाने तिकीट विक्री होतं आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये मिळत असलेल्या हा वेगवान प्रतिसाद पाहून पहिल्या दिवशी ‘रेड २’ चित्रपट चांगली कमाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, आज ५,२९५ शोसाठी प्री-सेल्स बुकिंग होतं आहे. सोमवारी ही संख्या ३,९६८ होती. शनिवारी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर २४ तासांत ‘रेड २’ चित्रपटाची ४५.१६ लाखांची तिकीट विक्री झाली. तेव्हा देशभरात फक्त २,३३८ शोसाठी १३ हजारांहून तिकीटं विकली गेली होती. सोमवारी हा आकडा २९,७१५ झाला. आज सकाळपर्यंत ‘रेड २’ चित्रपटाची ६४, ३०० तिकीट विक्री झाली आहेत.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून अजय देवगण-रितेश देशमुखच्या या चित्रपटाने १.८३ कोटींची कमाई केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये ‘रेड २’ चित्रपटाची क्रेझ अधिक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, गुजरात, हैदाराबाद, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा प्रतिसाद पाहून ‘रेड २’ चित्रपट पहिल्या दिवशी १०-१२ कोटींची कमाई करेल, असं म्हटलं जातं आहे. तसंच पुढील २४ तासांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग अधिक वेगाने झाले तर चित्रपट पहिल्या दिवशी १५ कोटींपर्यंत कलेक्शन करू शकतो, असाही अंदाज लावला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘रेड २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी सांभाळली आहे. तसंच राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर व्यतिरिक्त रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रेड २’ चित्रपटात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची कथा पाहायला मिळणार आहे.