scorecardresearch

“आम्ही तिसऱ्या मजल्यावरुन..” अमिताभ बच्चन यांना ‘मेजर साब’च्या सेटवर झालेल्या दुखापतीबद्दल अजय देवगणचा खुलासा

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एक सीन करताना त्यांना झालेल्या दुखापतीबद्दल अजय देवगणचा खुलासा

major saab ajay devgn
फोटो : इंडियन एक्सप्रेस

वयाची सत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन आजही तितक्याच जोमाने कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत. बिग बी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘प्रोजेक्ट के’. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. याचदरम्यान अमिताभ यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. हैदराबादमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना त्यांना दुखापत झाली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली”. नुकतंच अजय देवगणनेही ‘भोला’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करतानाचा एक किस्सा सांगितला.

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हा करणार होते चेहेऱ्यावर शस्त्रक्रिया; देव आनंद यांनी दिलेला मोलाचा सल्ला

‘मेजर साब’ या चित्रपटातील एक अॅक्शन सीन करताना बच्चन यांना झालेल्या दुखापतीबद्दल अजय देवगण म्हणाला, “तेव्हा बच्चनजी स्वतः अॅक्शन करायचे. त्याकाळी सुरक्षेसाठी फारशी काही सोय नसायची. तेव्हा आम्हाला बऱ्याचदा दुखापत होत असे. बच्चनजी यांनी असे कित्येक सीन्स केले आहेत ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. ‘मेजर साब’ चित्रपटातील एका सीनमध्ये मला आणि बच्चनजी यांना एकत्र ३० फुटांवरुन उडी मारायची होती. मी अमिताभ बच्चन यांना यासाठी स्टंटमॅन वापरायची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला आणि आम्ही एकत्र तो सीन केला, तेव्हासुद्धा आम्हाला दुखापत झाली होती. हा त्यांचा उत्साह आहे.”

‘भोला’चा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. तर अजय व तब्बूच्या लूकचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. ‘भोला’ हा दाक्षिणात्या चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय-तब्बूसह राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आदी कलाकारांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 19:44 IST