अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक आतुर होते. ट्रेलरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या दृश्यम २ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे.

‘दृश्यम २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली. ‘दृश्यम २’ हा ‘ब्रह्मास्र’ नंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर पहिल्याच विकेंएण्डला ‘दृश्यम २’ने बॉक्स ऑफिसवर ६४.१७ कोटींचा गल्ला जमवला. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ‘दृश्यम २’ची जादू बॉक्स ऑफिसवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी या चित्रपटाने १० कोटींची कमाई केली. चार दिवसांत दृश्यम २ने बॉक्स ऑफिसवर ७४.१४ कोटींचा गल्ला जमवला आहे.

nashik water crisis marathi news, nashik water tankers marathi news
नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर
school boy electrocuted pune marathi news
पुणे: आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्ता येथील घटना
Girl Dies After Eating Cake
१० व्या वाढदिवशी खाल्लेल्या केकने चिमुकलीचा मृत्यू, झोमॅटोची हॉटेलवर कारवाई; कुटुंबाने सांगितलं पूर्ण प्रकरण
Gold Silver Price
Gold-Silver Price on 1 April 2024: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात तेजी, वाचा आजचे दर

हेही वाचा >> Drishyam 2: ‘दृश्यम २’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; हॉटस्टार, नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राईम? जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार

हेही वाचा >> “मी लग्न करू की नको?” चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली, “करून टाका माझा…”

‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ हा मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. आता ‘दृश्यम २’ पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत.

हेही पाहा >> Photo: किंग खान ते सानिया मिर्झा, ‘या’ भारतीय सेलिब्रिटींकडे आहे दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’

अजय देवगणसह ‘दृश्यम २’ मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. तर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही या चित्रपटात झळकला आहे. सिद्धार्थने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.