Auron Mein Kahan Dum Tha collection: बॉलीवूड अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा ‘औरों में कहाँ दम था’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. शुक्रवारी (२ ऑगस्ट) हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली होती, त्यानंतर एका आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत फारशी वाढ झालेली नाही. एका आठवड्यात या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊयात. अजय देवगण व तब्बू यांचा हा एकत्र १० वा चित्रपट आहे. ‘भोला’, ‘दृश्यम २’ यासारख्या दमदार चित्रपटांनंतर पुन्हा एकदा अजय व तब्बूची जोडी ‘औरों में कहाँ दम था’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. रोमँटिक चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ पहिल्या दिवशी भारतातील बॉक्स ऑफिसवर फक्त १.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.१५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी एक कोटी, पाचव्या दिवशी ९५ लाख, सहाव्या दिवशी ७५ लाख व सातव्या दिवशी ६४ लाख रुपये कमावले. Video: “त्याला गेम नाही, पण माणसं कळली,” सुरज चव्हाणला केर काढताना पाहून उत्कर्ष शिंदे म्हणाला, “शिक्षण नसूनही कधी…” ‘औरों में कहाँ दम था’ चित्रपटाची कमाई या चित्रपटाची एका आठवड्यातील भारतातील एकूण कमाई १०.९ कोटी रुपये झाली आहे. या चित्रपटाने भारताबाहेर १.७५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १२.८५ कोटी रुपये झाले आहे. ‘औरों में कहाँ दम था’ चित्रपटाचे बजेट तब्बल १०० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. त्या तुलनेने चित्रपटाने केलेली कमाई खूपच कमी आहे. एका आठवड्याची आकडेवारी पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. औरों में कहाँ दम था सिनेमाचे पोस्टर (फोटो - अजय देवगण इन्स्टाग्राम) सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार ‘लापता लेडीज’, सरन्यायाधीशांनी सांगितलं स्क्रीनिंगचं कारण आकडेवारीनुसार, या चित्रपटाने जगभरात फक्त १२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवरून प्रेक्षकांनीही हा चित्रपट नाकारल्याचे दिसून येतंय. सध्याची परिस्थिती पाहता हा चित्रपट पुढच्या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये दिसण्याची शक्यता कमीच आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू यांच्याबरोबरच शंतनू माहेश्वरी, जिमी शेरगिल व सई मांजरेकर देखील आहेत.